Wednesday, February 1, 2023

अमृता फडणवीसांची नवाब मलिकांना कायदेशीर नोटीस

- Advertisement -

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क

राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी  देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी प्रत्यूत्तर म्हणून नवाब मलिक यांना कायदेशीर नोटीस पाठवली आहे.

दरम्यान, मानहानीकारक आणि दिशाभूल करणारे ट्विट ४८ तासांत डिलीट करा आणि सार्वजनिकपणे माफी मागा. अन्यथा मानहानीच्या खटल्याला सामोर जा. अशा स्वरूपाची नोटीस अमृत फडणवीस यांनी नवाब मलिक यांनी पाठवली आहे.

- Advertisement -

मानहानीच्या खटल्यासह फौजदारी कारवाईचाही इशारा या नोटीसच्या माध्यमातून देण्यात आला आहे. कलम ४९९ आणि ५०० अंतर्गत कारवाईचा इशारा देण्यात आलेला आहे. एकंदरीत आता अमृता फडणवीसांनी नवाब मलिकांना कायदेशीर नोटीस पाठवली असून नोटीस वॉर, अशा प्रकारचं चित्र रंगताना आपल्याला पहायला मिळत आहे.

दरम्यान, नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेऊन विविध प्रकारचे आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर केले होते. अंडरवर्ल्डच्या व्यक्तींशी त्यांचे संबंध आहेत. अशा प्रकारचं वक्तव्य करत नवाब मलिक यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला होता. त्यामुळे राजकीय वातावरण आता ढवळून निघालं असून दोघांनीही ऐकमेकांच्या कुटुंबियांना नोटीस पाठवली आहे.

 

spot_imgspot_img

हे वाचायलाच हवे