अमृतकर व महाजन परिवारचा कौटुंबिक पध्दतीने विवाह संपन्न

0

पारोळा (प्रतिनिधी) कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी  खबरदारीच्या उपाययोजना म्हणून गर्दीच्या ठिकाणी कोणी ही एकत्रीत येऊ नये या उद्देशाने विवाह संमारंभा बरोबरच इतर सार्वजनिक कार्यक्रम टाळण्यासाठी शासनाने खबरदारी म्हणून महाराष्ट्रातील सर्व जिल्हाधिकारी यांच्या आदेशान्वये  मंगल कार्यालय, लाॅन्स, इतरत्र हाॅल यांना दि. १९ मार्च रोजी नोटीस बजावण्यात आल्याने अमृतकर परिवारतील विवाह कौटुंबिक पध्दतीने कळवण येथे संपन्न झाला.

पारोळा येथील श्री सुलाईबुलाई माता परिवारचे मार्गदर्शक किराणा  व्यापारी माधुरी- राजेंद्र मुरलीधर अमृतकर यांचे चि. सौरभ यांचा विवाह कळवण येथील अनिता-सुनील गंगाधर महाजन यांची कन्या दामिनी हिच्याशी करण्याचे नियोजित करण्यात आले होते.  त्या नियोजनाने दोघं कुटुंबियांनी १५०० ते १८०० नातेवाईक व आप्तेष्टांना निमंत्रण पत्रिकेचे वाटपहि केले होते.  परंतु कोरोना विष्याणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासन सर्वत्परी उपाययोजना करीत असल्याने १९ पासून सार्वजनिक कार्यक्रमांनवर बंदी घातल्याने वर – वधु दोन्ही परिवार यांनी समन्वय साधत राजेंद्र अमृतकर यांनी समाज अध्यक्ष किरण वाणी, सुलाई बुलाई माता भक्त परीवाराचे दत्तात्रय येवले, भालचंद्र वाणी यांच्याशी चर्चा अंती आपणही सहभागी होऊन गर्दी टाळावी या उद्देशाने १९ रोजी होणारा विवाह सर्व तयारी व उत्साह बघता त्यांनी पुढे न करता दिनांक १८ रोजी कौटुंबिक पध्दतीने संपन्न झाल्याने यांच्या या निर्णयाचे स्वामी समर्थ विद्यालाचे अध्यक्ष बापुराव नावरकर, सौभद्र कम्प्युटरचे संचालक सुहास येवले, डाॅ. रविद्र नावरकर, प्रशांत येवले, हेमकांत मुसळे ,दर्पण समुह अध्यक्ष विजय नावरकर यांच्या सह सर्वत्र अंभिनंदन होतं आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.