अमळनेर हा भाजपाचा बालेकिल्ला,नव्या जोमाने कामाला लागा ; जिल्हाध्यक्ष राजू मामा भोळे

0

स्व. उदय वाघ यांच्या आठवणीला दिला उजाळा

अमळनेर (प्रतिनिधी):- स्व. उदय वाघ यांनी अमळनेर मतदार संघाला पक्षाचा बालेकिल्ला बनवला आहे त्यांच्यात मोठे संघटन कौशल्य होते. पक्ष वाढला तर आपण वाढू म्हणून आगामी काळात होऊ घातलेल्या नगरपालिका, मार्केट कमिटी, शेतकी संघ या निवडणुकांसाठी कार्यकर्त्यांनी रुसवे फुगवे बाजूला सारून केवळ पक्षासाठी कामाला लागा,  असे आदेश जिल्हाध्यक्ष तथा आमदार सुरेश भोळे (राजू मामा) यांनी सोमवारी अमळनेर येथे दिले. माजी आमदार स्मिताताई यांनी ही मार्गदर्शन करून कार्यकर्त्यांना ऊर्जा दिली.

आमदार सुरेश भोळे यांची भाजपाच्या जिल्हाध्यक्ष पदी निवड झाल्यानंतर ते जिल्हाभर कार्यकर्ता व पदाधिकारी यांची भेट आणि बैठका घेऊन परिचय करून घेत आहेत. सोमवारी ते अमळनेर येथे आले असता कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात स्थापन केलेल्या गणरायाची त्यांच्या हस्ते आरती करण्यात आली. यावेळी माजी आमदार स्मिताताई वाघ, अॅड. ललिताताई पाटील,सभापती प्रफुल्ल पवार, तालुकाध्यक्ष हिरालाल पाटील,शहराध्यक्ष उमेश वाल्हे, जि.प.सदस्य संगीताताई पाटील, उपसभापती भिकेश पाटील, अॅड.व्हि.आर. पाटील,माजी सभापती श्याम बापू अहिरे, सरचिटणीस राकेश पाटील,बबलू राजपूत,राहुल पाटील,कृ.उ.बा.संचालक पराग पाटील, राहुल पाटील,प्रकाश पाटील,सिनेट सदस्य दिनेश नाईक,माजीअध्यक्ष शितल देशमुख, दीपक पाटील,देवा लांडगे,सचिन पान पाटील,युवा मोर्चा अध्यक्ष शिवाजी राजपूत,योगीराज चव्हाण,पंकज भोई,राहुल चौधरी,समाधान पाटील,अयाज बागवान,निखिल पाटील,भूषण पाटील,महेश पाटील,राहुल कंजर आदी उपस्थित होते.

आमदार भोळे यांच्या हस्ते दिवंगत जिल्हाध्यक्ष हरी भाऊ जावळे व नाटेश्वर पाटील जानवे यांच्या स्मरणार्थ कृषी उत्पन्न बाजार समिती येथे वृक्षारोपण करण्यात आले.

तसेच अमळनेर येते कोरोना काळात अहोरात्र सेवा देणारे ग्रामीण रुग्णालय डॉ. प्रकाश ताडे, डॉ. जितेंद्र पाटील, सुवार्ता वळवी, प्रियांका लधानी,राम मंदिर आंदोलन वेळी आयोध्याला गेलेले कारसेवक झुलाल पाटील, दिनेश नाईक, गोकुळ परदेशी, सखाराम जाधव यांचा सत्कार केला. तसेच अमळनेर मधील मुस्लिम युवक कोरोना बाधित रुग्णाच्या मृत्युनंतर अंतीमसंस्कार करणाऱ्या आवास फाउंडेशनच्या टीमचा देखील सत्कार केला.आभार चंद्रकांत कंखरे यांनी केले.

यावेळी आमदार सुरेश भोळे यांनी माजी जिल्हाध्यक्ष स्व. उदय वाघ यांच्या आठवणीला उजाळा देत त्यांनी सांगितले उदय बापू गेल्याने जिल्ह्यांचे व पक्षाचे खूप मोठे नुकसान झाले आहे. त्यांच्यामुळे संघटनेत काम कसे करायचे ते आम्ही शिकलो. ते जिल्हाध्यक्ष व महानगर अध्यक्ष होतो. त्यांनी अमळनेर नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यात पक्ष वाढीसाठी मोलाचे योगदान दिले आहे. यात स्मिताताई यांचेही मोठे काम आहे. म्हणून ताईच्या नेतृत्वाखाली  सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये भाजपाची सत्ता येण्यासाठी सर्वांनी आत्तापासूनच कामाला लागावे,असे आवाहन केले.

Leave A Reply

Your email address will not be published.