अमळनेर येथे कृषी अवजारे बँकेच्या शेडचे भूमिपूजन

0

अमळनेर (प्रतिनिधी)

तालुक्यातील टाकरखेडा येथील मातोश्री,इंदूताई ऍग्रो फार्मर प्रड्युसर कंपनी लि.यांच्या कृषि अवजारे बॅंक नविन शेडचे भूमिपूजन, मा. श्री. श्रीकांत झांबरे ए. जी. एम  नाबार्ड यांच्या हस्ते संपन्न झाले. याप्रसंगी त्यांनी कंपनीचे संचालक व सभासदांना शेतकरी उत्पादक कंपनीचा विकास आणि शेतकऱ्यांच्या  हिताबाबत   मार्गदर्शन केले . आणि दुपारच्या सत्रात  ( PMIC ) संपन्न झाली.

महाराष्ट्र सहकार व पणन विभाग – महाराष्ट्र शासनाच्या कडून एम. सी. पाटील  यांनी रासायनिक खतांचा संतुलित वापर या विषयी माहिती दिली . याप्रसंगी  बी- बियाणे , रासायनिक खते आणि कीटकनाशके केंद्राचे उदघाटन करण्यात आले. महाराष्ट्र शासन कृषि विभाग अमळनेर यांच्याकडून शेतकऱ्यांना, बाजरी  बियाण्याचे  मोफत वाटप करण्यात आले.

कृषि विभागाकडून  कृषि प्रवेक्षक दिनेश पाटील,  पूनम. टी. पाटील,  सुभाष पाटील कृषि सहायक उपस्थित होते. त्यांनी शेतकऱ्यांना माहिती दिली. कार्यक्रमाचे औचित्य साधून कृषि संजिवनी सप्ताह साजरा करण्यात आला. त्याबाबत भूषण पाटील तालुका-तंत्र अधिकारी, आत्मा अमळनेर कृषि कार्यालय यांनी शेतकऱ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाला रामदास रुपशिंग भिल सरपंच टाकरखेडा हे अध्यक्ष स्थानी होते.  तर आनंदराव भिला  पा.  माजीसरपंच, प्रकाश धोंडू पाटील माजी सरपंच, जुंमा करीम पिंजारी, रामकृष्ण कोळी, वैशाली जितेंद्र जाधव , मनिषा गुणवंत पाटील ग्रामपंचायत सदस्य, सुरेखा प्रभाकर पाटील , छायाबाई कालिदास पाटील, आशाबाई संदीप पाटील, राजेंद्र रामभाऊ पवार, महेश विजय पाटील, किरण अशोक पाटील, प्रेमराज श्रीराम पाटील कंपनी संचालकी  व सभासद उपस्थित होते. नाबार्ड -पॉपी  राजमाता जिजाऊ महिला मंडळाच्या  अध्यक्ष  पूनम भटू पाटील यांनी उत्कृष्ट प्रकारे कार्यक्रमाचे नियोजन केले होते.

Leave A Reply

Your email address will not be published.