अमळनेर (प्रतिनिधी):- खान्देश शिक्षण मंडळ संचालित स्व. श्री. पंढरीनाथ छगनशेठ भांडारकर कॉलेज ऑफ डी. फार्मसी, महाविद्यालयाचा शैक्षणिक वर्ष २०१९-२० मधील प्रथम वर्षाचा निकाल, महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ मुंबई यांच्या कडून जाहीर झाला आहे. त्यात महाविद्यालयाचा १०० टक्के निकाल लागलेला आहे. यामध्ये प्रथम वर्षाचे सर्व विद्यार्थी प्रथम श्रेणी मध्ये उत्तीर्ण झालेले आहेत. महाविद्यालयातून फिजा जमालोद्दिन मुजावर (९३.७९%) प्रथम क्रमांकाने, तसेच नरेश राजेंद्र पाटील (९२.३६%)द्वितीय, कृतिका लहू मगरे (९०%)तृतीय, सोनाल दिलीप पाटील (९०%),तृतीय, कुणाल मनोहर महाजन (८८.५%)चतुर्थ, सेजल नरेंद्र कोठावदे(८७.४६%)पाचव्या क्रमांकाने उत्तीर्ण झाले आहेत.
यशस्वी विद्यार्थ्यांचे खा. शि. मंडळाचे कार्याध्यक्ष योगेश मुंदडे, कार्योपाध्यक्ष निरज अग्रवाल, महाविद्यालयाचे चेअरमन डॉ.बी.एस. पाटील,संचालक हरी भिका वाणी, डॉ संदेश गुजराथी, प्रदीप अग्रवाल , जितेंद्र जैन, कल्याण पाटील, चिटणीस डॉ. अरुण जैन, प्राचार्य प्रा. रविंद्र गंगाराम माळी, प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.
