अमळनेर मतदारसंघातील विकास कामांसाठी भरघोस भरीव निधी प्राप्त करून घेतल्याबद्दल आमदारांचे जंगी स्वागत

0

अमळनेर : तालुक्याचे आमदार भूमिपुत्र अनिल पाटील यांचे उद्या दि 11 मार्च 2021 रोजी सकाळी मुंबईहून बांद्रा एक्स्प्रेस ने  अमळनेरला सकाळी 9:00 वा  अधिवेशन आटपून आगमन होणार आहे. त्यावेळी पक्षातर्फे जंगी स्वागत करण्यात येणार आहे.

तालुक्यातील उपेक्षित असलेल्या पाडळसरे धरणासाठी 135 कोटी रुपये निधी,  प्रशासकीय इमारत 14 कोटी 17 लाख रु निधी, जलसंधारण 12 कोटी निधी,  टाकरखेडा उड्डाण पूल 34 कोटी, सार्वजनिक रस्ते 25 कोटी असा अभुतपुर्व निधी अमळनेर मतदारसंघातील विकास कामांसाठी आणला तरी सर्व कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा करण्यासाठी सकाळी रेल्वे स्थानकावर उपस्थिती द्यावी व  त्यांच्या स्वागतासाठी हजर राहावे असे आवाहन राष्ट्रवादीच्या सर्व तालुका, शहर, युवक, महिला सह सर्व फ्रंटचे अध्यक्ष कार्यकर्ते व पक्षाचे विविध पदाधिकारी यांनी हजर राहावे असे आवाहन राष्ट्रवादी पक्षातर्फे करण्यात आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.