अमळनेर(प्रतिनिधी) शासनाने जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव,अमळनेर,जामनेर व पाचोरा या बाजार समित्यांवर प्रशासक नेमले आहेत, तर महाविकास आघाडीच्या ताब्यात असलेल्या बाजार समित्यांना मुदतवाढ दिलेली दिसून येत आहे.यात जळगाव, धरणगाव व पारोळा या समित्यांचा समावेश होतो.
यात अमळनेर कृउबा बाजार समितीच्या संचालक मंडळाला मुदत वाढवून न मिळाल्याने २१ पासून प्रशासक नियुक्त करण्यात आले आहे.अमळनेर बाजार समिती संचालक मंडळाची मुदत १४ सप्टेंबर पर्यंत होती, परंतु शासनाने मुदतवाढ न देता साहाय्यक निबंधक जी.एच.पाटील यांना प्रशासक नियुक्त केले.त्यांनी २२ पासून पदभार देखील स्वीकारला.संचालक मंडळ शेतकऱ्यांच्या हितासाठी न्यायालयात धाव घेणार आहे.
“कोरोनाच्या काळात प्रशासक नेमण्यापेक्षा, अमळनेर कृउबा समितीला मुदतवाढ मिळयला हवी होती,शासन सुडाचे राजकारण करत आहे, शेतकऱ्यांच्या हितासाठी आम्ही न्यायालयात जाणार आहोत,आमचा न्यायदेवतेवर विश्वास आहे”
– माजी आमदार स्मिता वाघ