आ.स्मिता वाघ यांचा अधिवेशनात तारांकित प्रश्न,कार्यवाही सुरू असल्याचा मुख्यमंत्र्यांचा खुलासा
अमळनेर- अमळनेर पोलीस स्टेशनचे विभाजन करून तालुका व शहर पोलीस स्टेशनची निर्मिती होण्याबाबतच्या प्रस्तावाचा समावेश दुसऱ्या टप्प्यात करण्यात आला असुनही प्रस्ताव प्रलंबित असल्याचे निदर्शनास आले आहे, हे खरे आहे का?असा सवाल आ.सौ स्मिता उदय वाघ यांनी पावसाळी अधिवेशनात तारांकित प्रश्नाद्वारे उपस्थित करून या महत्वपूर्ण विषयाकडे शासनाचे लक्ष वेधले.
अमळनेर शहर व तालुक्यात गुन्हेगारीचे वाढते प्रमाण आणि वाढता विस्तार लक्षात घेता शहर आणि तालुका अशा दोन पोलीस ठाण्याची गरज असल्याने व सादर केलेल्या प्रस्तावासंदर्भात शासन दरबारी हालचाली दिसत नसल्याने स्मिता वाघ यांनी हा तारांकित प्रश्न सादर केला होता,यात त्यांनी सदर प्रस्तावाबाबत वित्त विभागाच्या दि 25 मे 2017 रोजीच्या शासन निर्णयानुसार राज्य पोलिस दलाचा आकृतिबंध निश्चित करून प्रस्ताव फेरसादर करण्यास अभिप्राय दिले आहेत,हे खरे आहे का आणि असल्यास या प्रकरणी चौकशी करून वित्त विभागाने दिलेल्या अभिप्रायानुसार कोणती कारवाई केली,अथवा त्याबाबतची सत्य परिस्थिती काय?व विलंबाची करणे काय?आदी मुद्दे त्यांनी उपस्थित केले होते.
यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लेखी खुलासा करताना म्हटले आहे की अमळनेर पोलीस ठाण्याच्या विभाजनाचा प्रस्ताव सादर असून दुसऱ्या टप्प्यात समावेश झाला आहे, महाराष्ट्र राज्य पोलिस दलाच्या सुधारित मापदंडानुसार आकृतीबंध निश्चितीचा प्रस्ताव सादर करण्याबाबत पोलीस महासंचालक कार्यालयास कळविण्यात आले असुन पोलीस महासंचालक कार्यालयामार्फत याबाबत कार्यवाही सुरू आहे.