अमळनेर न.प. सत्ताधारी गटावर टांगती तलवार (अग्रलेख )

0

अमळनेर नगरपालिकेतील सत्ताधारी गटाच्या 22 नगरसेवकांना अपात्र ठरविण्याचा निर्णय जिल्हाधिकारी ढाकणे यांनी काल जारी केला. या 22 नगरसेवकांना दुसर्याांदा अपात्र केले जात आहे. यापूर्वी 29 जानेवारी 2017 रोजी तत्कालीन जिल्हाधिकारी किशोरराजे निंबाळकर यांनी लोकनियुक्त नगराध्यक्ष पुष्पलता पाटील यांचेसह 22 नगरसेवकांना अपात्र केले होते. आता जिल्हाधिकारी ढाकणे यांनी नगराध्यक्षा पुष्पलता पाटील यांचे बाबतीत निर्णय राखून ठेवला आहे. अतिक्रमण काढण्याच्या निर्णयाला कायदा आणि सुव्यवस्थेचे कारण देऊन स्थगिती देण्याचा निर्णय सभेमध्ये घेतला होता. त्यामुळे या 22 नगरसेवकांच्या विरोधात अपात्रतेचा बडगा 29 जानेवारी 18 रोजी घेण्यात आला होता नगरपालिकेचे तत्कालीन मुख्याधिकारी यांनी दबावाखाली या ठरावाला मंजुरी दिली होती म्हणून त्यांचेवर कारवाई होणार आहे 2018 मध्ये 23 नगरसेवकांच्या अपात्रप्रकरणी तातडीने नगरविकास रायमंत्री यांचेकडे अपील केल्यानंतर त्याला स्थगिती देण्यात आली होती. नगराध्यक्ष हा लोकनियुक्त असल्याकारणाने त्यांना अपात्र ठरविण्याचा अधिकार जिल्हाधिकार्याांच्या अख्त्यारित येत नाही असे तांत्रिक कारण पुढे करून नगरविकास रायमंत्र्यांनी स्थगिती दिली होती. या निर्णयाच्या विरोधात आ. शिरीष चौधरी गटाचे नगरसेवक प्रविण पाठक यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात अपील केले होते. त्यावर 15 दिवसात नगरविकास रायमंत्र्यांनी निर्णय घ्यावे असा आदेश दिला होता. त्यानंतर आता हे प्रकरण पुन्हा ऐरणीवर आल्याने विद्यमान जिल्हाधिकारी ढाकणे यांनी कायद्याचा संपूर्ण अभ्यास करून 22 नगरसेवकांना अपात्र ठरविले आणि नगराध्यक्षा पुष्पलता पाटील यांचे बाबतीतला निर्णय राखून ठेवला. जिल्हाधिकार्याांच्या या निर्णयाविरोधात हे 22 नगरसेवक अपीलात जाणार असल्याची माहिती माजी आमदार साहेबराव यांनी दिली. 2018 ची आणि आताची परिस्थिती वेगळी आहे. भाजपचे जिल्हाध्यक्ष उदय वाघ यांची भाजपत चलती होती. त्यांनी पुढाकार घेऊन तातडीने नगरविकास रायमंत्र्यांकडून स्थगिती मिळविण्याससहकार्य केले होते. आता एक वर्षभरात पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले आहे. आ. स्मिता वाघ यांना मिळालेली जळगाव लोकसभेची उमेदवारी ऐनवेळी रद्द करण्यात आली. त्यातून बरेच राजकारण झाले. उदय वाघ हे जिल्हाध्यक्ष असतांना त्यांनी अमळनेरच्या पक्षाच्या प्रचार सभेत जो दांगडो केला. त्यामुळे पक्षाची इभ्रत धुळीस मिळविली त्याचा परिणाम भाजपातील त्यांचे स्थान डळमळीत झाले आहे. त्यामुळे त्यांच्या शब्दाचा वरिष्ठाकडे कितपत मान राखला जाईल हे सांगता येत नाही. त्यात भाजपचे  संकटमोचक जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांचे आणि उदय वाघ यांचे संबंध पुर्वीसारखे राहिलेले नाहीत. त्यामुळे साहेबराव पाटलांना त्याचा फार मोठा फटका बसण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यातच लोकसभा निवडणुकीत साहेबराव पाटील यांनी साधलेली चुप्पी याचे भांडवल विद्यमान आमदार शिरीष चौधरी करतीलच कारण साहेबराव पाटील यांचा पराभव करून शिरीष चौधरी हे अपक्ष म्हणून निवडून आले आणि त्यानंतर भाजपचे सहयोगी सदस्य बसले. आता अमळनेर मतदार संघातून भाजपतर्फे विधानसभेची उमेदवारी लढविण्यासाठी आ. शिरीष चौधरी इच्छुक आहेत. माजी आमदार साहेबराव पाटील हे सुद्धा आमदारकीसाठी गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेले आहेत. त्यामुळे साहेबराव पाटलांचा पुढचा प्रवास सुखकर व्हायचा असेल तर त्यांनी आ. शिरीष चौधरी यांचेशी हातमिळवणी करणे आवश्यक आहे.

2017 मध्ये अमळनेर नगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक झाली तेव्हा आताच्या भाजपत असलेला सत्ताधारी गट पुर्णता सर्वपक्षीय आघाडी करून निवडणूक लढविली होती. त्यात रा. काँ. चे अनिल भाईदास पाटील यांचे नेतृत्वातील सर्वपक्षीय आघाडीतील लोकनियुक्त नगराध्यक्षासह पूर्ण बहुमत मिळाले होते. भाजपच्या पॅनलचा पूर्णपणे धुव्वा उडाला होता. भाजपचा एकमेव नगरसेवक निवडून आला होता. नगराध्यक्षपदाच्या उमेदवार श्रीमती ललवाणी पराभूत झाल्या. आ. शिरीष चौधरी यांच्या पत्नी सौ. अनिता चौधरी यासुद्धा नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत पराभूत झाल्या होत्या. परंतु शिरीष चौधरी पॅनलचे 11 सदस्य निवडून आले असल्याने ते सत्ताधार्याांशी चांगलीच टक्कर देत आहेत. भाजपच्या विरोधात लढा देऊन सर्वपक्षीय आघाडीने सत्ता प्राप्त केली असली तरी कुठे माशी शिंकली कळत नाही परंतु संपूर्ण गटच्या गट भाजपत दाखल झाला. या निर्णयामागे रायात सत्तेवर असलेल्या भाजपाकडून स्वार्थ साधण्याचा होता एवढे मात्र निश्चित 2009 च्या निवडणुकीत अपक्ष आमदार म्हणून निवडून आलेले साहेबराव पाटील पुढे राष्ट्रवादीत गेले. तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे भक्त बनले. एकच वादा अजित दादा अशी घोषणा करून साहेबराव पाटील हे अजित पवारांवरील निष्ठा व्यक्त करायचे कारण त्यावेळी रायात ते उपमुख्यमंत्री म्हणून सत्तेत होते. त्यानंतर भाजपविषयी त्यांना काय दृष्टांत झाला हे सांगणे कठीण असले तरी सत्तेच्या दावणीत त्यांनी प्रवेश केला. आता पुढची त्यांची वाट खडतर आहे. घोडा मैदान जवळ आहे. काय होते ते दिसून येईल.

Leave A Reply

Your email address will not be published.