अमळनेर नगरपालिकेचे मुख्याधिकारी डॉ. उत्कर्ष गूटे निलंबित

0

बैठकांना उपस्थित राहत नसल्याचा ठेवण्यात आला ठपका
अमळनेर– येथील नगरपालिकेचे मुख्याधिकारी यांच्यावर बैठकांना उपस्थित न राहणे , विकास कामांना एनसी देण्यास टाळाटाळ केल्याचे आढळून आल्याने अमळनेरचे मुख्याधिकारी डॉ. उत्कर्ष गूटे यांना तडकाफडकी निलंबित करण्यात आले आहे. यासंदर्भातील प्रशासनाचे आदेश आज दुपारी बारा वाजेच्या सुमारास पालिकेस प्राप्त झाले असून मुख्याधिकारी डॉ. उत्कर्ष गूटे हेमुंबईला असल्याची माहिती मिळाली असून त्यांना ऑर्डर बजावता आली नाही.

दरम्यान, त्यांच्या रिक्त जागेवर आता मुख्याधिकारी पदाचा प्रभारी पदभार भुसावळचे मुख्याधिकारी बी.टी. बाविस्कर किंवा जामनेर नपा च्या मुख्याधिकारी शोभा बाविस्कर घेणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली असून दुपारपर्यंत ते पदभार स्वीकारण्याची शक्यता आहे. जिल्हा प्रशासनाने आयोजित केलेल्या पाणीपुरवठा नियोजन बैठक तसेच मुंबई येथे भुयारी गटारांसंदर्भात झालेल्या बैठकीला गूटे हे कारण न देता गैरहजर राहिले होते. यासह आ. शिरीष चौधरी यांनी आमदार निधीतून मंजूर केलेल्या कामांना एनसी देण्यास ते टाळाटाळ करीत असल्याचे समोर आले असल्याने त्यांच्यावर प्रशासनाकडून हि कारवाई केल्याचे म्हटले जात आहे .

Leave A Reply

Your email address will not be published.