Thursday, September 29, 2022

अमळनेर नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांना माजी नगरसेवक राजु फाफोरेकर यांच्याकडून मिठाई वाटप

- Advertisement -

अमळनेर (प्रतिनिधी):- प्रभाग क्रं ७ मधील नगरपरिषदेचे सफाई कर्मचारी तसेच इतर कर्मचाऱ्यांना दिवाळी निमित्त माजी नगरसेवक राजु दादा फाफोरेकर व कल्पनेश्वर प्रतिष्ठान च्या संयुक्त विद्यमाने मिठाई वाटप करण्यात आली.कोरोनाच्या काळात स्वतःच्या आरोग्याची पर्वा न करता अहोरात्र प्रभागाच्या स्वच्छतेसाठी या कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.
यावेळी प्रभाग क्रमांक ७ मध्ये कार्य करणारे अनिल रामराजे (मुकादम),
संजय संदानशिव,इरफान शेख, गोकुळ लोहेरे,राजरत्न सोनवणे, सलील मोहन इ. नगरपरिषद कर्मचाऱ्यांना मिठाई वाटप करून त्यांची दिवाळी आनंदात जावो अशा सदिच्छा व्यक्त केल्या.
यावेळी कल्पनेश्वर प्रतिष्ठानचे सर्व सदस्य विनायक पाटील, अनिरुद्ध ठाकरे, दिनेश पाटील, मयूर साळुंखे, हितेश पवार, हरीश वाणी, निलेश पाटील, शरद पवार, अभिषेक ढमाळ, भूषण पाटील, पवन लोहार, मंगेश शिरसाठ, विवेक पाटील, पपू पवार, वैभव पवार, गणेश पाटील, अतुल सावकारे, सचिन परदेशी,भूषण सनेर, रोहित,मंदार आदी नागरिक उपस्थित होते.

- Advertisement -
spot_imgspot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

हे वाचायलाच हवे

संबंधित बातम्या