अमळनेर तालुक्यासाठी जलसंजीवनी ठरणाऱ्या पाडळसरे धरणाचे भाग्य उजळणार- आ. स्मिताताई वाघ

0

धरणास दोन दिवसात मिळणार केंद्रीय जलायोगाची मान्यता, केंद्रीय मंत्री गडकरींनी दिली माहिती

अमळनेर –

तालुक्यासह परिसरातील सहा तालुक्यातील शेतकरी बांधवांसाठी भाग्यलक्ष्मी ठरणाऱ्या निम्न तापी प्रकल्प म्हणजे पाडळसरे धरणासाठी केंद्रीय जलआयोगाची मान्यता दिनांक 29 ऑगस्ट रोजी दिल्ली येथे होणाऱ्या बैठकीत देण्याचे शुभसंकेत केंद्रीय जलसंपदा मंत्री नितीन गडकरी यांनी काल दिल्ली येथे आ.सौ.स्मिताताई वाघ यांना दिले,यावेळी खासदार ए. टी. पाटिल यांची प्रमुख उपस्थिती होती,यानिमित्ताने पाडळसे धरणाचे भाग्य आता उजळणारच असा विश्वास आ सौ वाघ यांनी व्यक्त केला आहे.
केंद्रीय जलसंपदा मंत्री नितिन गडकरी व केंद्रीय जलआयोगाचे चेयरमन एस एम हुसेन यांची काल दिल्ली येथे आ सौ वाघ यांचेसह खा पाटील यांनी प्रत्यक्ष भेट घेऊन कोणत्याही परिस्थितीत आमचा हा धरणाचा जिव्हाळ्याचा प्रश्न निकाली काढा अशी आग्रही मागणी केली,यासंदर्भात लेखी निवेदन देख त्यांनी दिले,आ सौ वाघ यांनी अमळनेर तालुक्याच्या स्थितीची व्यथा देखील मांडली व धरणासाठी केंद्रीय जल आयोगाची मान्यता प्रलंबित असल्याने ती त्वरित दयावी अशी गळ घातली,या अनुशंगाने गडकरी यानीही सकारात्मक प्रतिसाद देत अवघ्या दोनच दिवसात धरणाचा प्रश्न हे सरकार सोडणार असून दि 29 ऑगस्ट रोजी जलआयोगाच्या होणाऱ्या बैठकीत पाडळसे धरणास मान्यता देणार असल्याचे शुभसंकेत दिलेत.व या मान्यतेनंतर केंद्रीय योजनेच्या माध्यमातून धरणास एकरकमी मोठा निधी मिळून हे धरण त्वरित पूर्ण होईल व अमळनेर तालुक्यासह परिसरातील तालुके सुजलाम सुफलाम होतील असा विश्वास गडकरी यांनी व्यक्त केला.यामुळे आ वाघ यांनी त्यांचे विशेष आभार व्यक्त केले.
दरम्यान गेल्या अनेक वर्षांपासून पुरेश्या निधीअभावी तापी नदीवरील या धरणाच्या कामास वेग येत नसल्याने बरेचसे पाणी छातीवरून वाहून जात आहे,राज्य सरकार धरणाबाबत सकारात्मक असले तरी धरणासाठी एकरकमी मोठा निधी लागणार असल्याने केंद्राशिवाय पर्याय नव्हता,यासाठी आ स्मिता वाघ यांनी राज्याचे जलसंपदा मंत्री ना गिरीश महाजन व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून सतत पाठपुरावा केला,अखेर राज्याच्या वित्त आयोगाने केंद्राकडून निधी मिळविण्यासाठी धरणास मान्यता देऊन हा प्रस्ताव केंद्रीय जलायोगाकडे सादर करण्यात आला होता,यानंतर स्मिता वाघ यांनी ना गिरीश महाजन यांच्या मदतीने केंद्रीय जलसंपदा मंत्री गडकरी यांच्याकडे सतत पाठपुरावा केला,यामुळे याच महिण्यात जल आयोगाच्या समितीने धरणाची प्रत्यक्ष पाहणी करून सकारात्मक शिफारस केली,अखेर स्मिता वाघ यांचे सततचे प्रयत्न सफल ठरून दोन दिवसात केंद्रीय जलायोगाच्या मान्यतेचे संकेत गडकरींनी दिले आहेत.यामुळे तालुक्याच्या अपेक्षा उंचावल्या आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.