अमळनेर (प्रतिनीधी) : अमळनेर शहर व तालुक्याचा विस्तार पाहता पोलीस बळावर मोठ्या प्रमाणावर ताण येत असुन विशेष करून निवडणुकीच्या काळात व अन्य वेळा काही वाद झाल्यास कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो.
तसेच सध्याच्या काळात अमळनेर तालुक्यात कोरोना चे संकट अधिकच गडद होत असुन या काळात पोलीस बांधवांना 24-24 तास कार्यरत राहावे लागते परिणामी त्यांच्या शारीरिक व मानसिक आरोग्यावर सुद्धा विपरीत परिणाम होऊ शकतो.तरी अमळनेर पोलीस ठाण्याचे शहर व ग्रामीण असे विभाजन करण्यासाठी तात्काळ कार्यवाही करावी तसेच सध्याच्या परिस्थितीत अमळनेर पोलीस ठाण्यात 105 पदे मंजुर असुन 65 पदे कार्यरत आहेत तरी उर्वरित 40 पदांची त्वरीत भरती करावी अशी मागणी कृषीभुषण साहेबराव पाटील यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या कडे केली आहे.