अमळनेर तालुक्यात कोरोनाचा कहर सुरूच ; एकाच दिवसात ९५ पॉझिटिव्ह आढळले

0

अमळनेर :- २३ ऑगस्ट रोजी तालुक्यात ९५ बाधित रुग्ण आढळून आले आहेत. आतापर्यंतचा हा सर्वोच्च आकडा आहे. तर आज १९ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. या रुग्णात अमळनेर शहरातील ५२, ग्रामीण भागात ९, खाजगी दवाखान्यात दाखल ५, कॉन्टॅक्ट पेशंट २९ असे एकूण ९५ बाधित आहेत. त्यामुळे एकूण बाधित रुग्णांची संख्या १८२७ झाली आहे. त्यापैकी १०८९ रुग्ण बरे झाले असून ५८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.जनतेने प्रशासनाला सहकार्य करणे अपेक्षित असतांना,जनतेकडून नियमांची पायमल्ली होतांना दिसून येत आहे.

सोमवारी जनता कर्फ्यु
जळगाव जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार सोमवारी जनता कर्फ्यु चे आवाहन नगरपालिका प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.मागील सोमवारी पोळा सणामुळे जनता कर्फ्यु चे आयोजन मंगळवारी करण्यात आले होते.सोमवारी दवाखाने व इतर आस्थापना सोडून सर्व व्यवहार बंद असतील असे प्रशासनातर्फे कळवण्यात आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.