अमळनेर :- शहरातील गांधलीपुरा भागातील एका चहाचे दुकान फोडून चोरट्यांनी गल्ल्यातुन पैसे पळविले
शहरातील गांधलीपुरा भागातील डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळ्या शेजारी असलेल्या सरकार टी या नावाने असलेल्या दुकानात रात्रीच्या सुमारास दुकानाचा मागील भागातील पत्रा उचकुंन आत शिरून गल्यातील जवळजवळ वीस हजार रुपये चोरट्यांनी लंपास केल्याचे दुकानदार आसिफ शेख यांनी दिलेल्या फिर्यादी मध्ये नमूद करण्यात आले आहे.पुढील तपास पोलिस सुनील हटकर हे करीत आहे.
गेल्या काही दिवसांपासून शहरासह तालुक्यात छोट्या मोठ्या चोरी सह दुचाकी वाहन चोरीचे प्रमाण वाढले असल्याचे कळतं. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. पोलीसांनी चोरांचा बंदोबस्त करावा अशी मागणी जोर धरू लागली आहे.
अमळनेर गांधलीपुरा सरकार चहाचे दुकान फोडून पैसे पळविले..
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -