Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • कुस्तीपटू अश्विनी पौळ यांची मुलांसह आत्महत्या
    • आमदारांच्या उपस्थितीत भाजप महिला आघाडीचे रक्षाबंधन
    • स्व डॉ. चारुदत्त साने यांच्या जयंतीनिमित्त रविवारी मोफत रोगनिदान शिबीराचे आयोजन
    • हल्ल्यानंतर विद्यानंद बापटांनी स्पष्ट केली मोठी भूमिका
    • उज्बेकिस्तानमधून सांगण्यापेक्षा देशात पत्रकार परिषद घ्या!
    • विमानाची पार्किंगदरम्यान खांबाला जोरदार धडक
    • बी.एन. अग्रवाल कन्स्ट्रक्शनचे निकृष्ठ काम चव्हाट्यावर!
    • अल्पवयीन विद्यार्थिनीवर अत्याचार; त्या नराधम शिक्षकास अद्दल घडवा!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»महाराष्ट्र»उत्तर महाराष्ट्र»जळगाव»अमळनेर कोरोना केअर सेंटर व कोव्हिड रुग्णालयातुन 22 रुग्ण कोरोनामुक्त
    जळगाव

    अमळनेर कोरोना केअर सेंटर व कोव्हिड रुग्णालयातुन 22 रुग्ण कोरोनामुक्त

    By July 16, 2020No Comments23 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    अमळनेर (प्रतिनिधी):- कोव्हीड केअर सेंटरमधून आतापर्यंत 385 जण कोरोनामुक्त होऊन रुग्ण घरपोच मिनी लक्झरीने रवाना झाले आहेत त्यांना आमदार अनिल पाटील माजी आमदार साहेबराव पाटील यांनी कोरोनामुक्त प्रमाण पत्र व क्वॉरोंटाईन नोटीस देत रवाना केले व आता त्यांना होम क्वॉरोंटाईन करण्यात आले आहे.

    यावेळी आमदार अनिल भाईदास पाटील, माजी आमदार प्रांताधिकारी सीमा अहिरे, तहसीलदार मिलिंद वाघ, मुख्याधिकारी डॉ विद्या गायकवाड, पोलीस निरीक्षक अंबादास मोरे, नगरपालिका उप मुख्याधिकारी संदीप गायकवाड, प्रशासन अधिकारी संजय चौधरी, गुप्तवार्ता शाखा प्रमुख शरद पाटील ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ प्रकाश ताळे, डॉ आशिष पाटील, प्रयोगशाळा तंत्रज्ञ जितेंद्र जाधव, डॉ मोहसीन पटेल, के आर साबळे, गिरीष शिंदे, परिचारिका एल व्ही चौधरी,पूनम नारे यांच्यासह इतर परिचारिका, आरोग्य कर्मचारी सफाई कामगार यांच्यासह पोलीस कर्मचारी व विविध कर्मचारी एसटी बस चालक सचिन पाटील आदी उपस्थित होते.

    दोन बालकांचा समावेश 

    यात दोन बालक एक बालिका यांच्यासह तरुणी मध्यम वर्गीय महिला पुरुष कोरोनामुक्त होऊन घरी परतले.यावेळी सर्व रुग्ण आनंदात होते. कोरोनावर मात केल्याची हास्यमुद्रा त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होती. या 22 जणांनी गुरुवारी सुटकेचा श्वास सोडला आहे. यापूर्वी 364 रुग्ण बरे करून सोडण्यात आले आहेत.

    पालिकेचा सॅनिटायझर करण्यात सिंहाचा वाटा 

    पालिकेचे गेल्या दीड महिन्यापासून कोरोनाचा प्रसार झाल्याच्या बातम्या झळकत आहेत तरी शहारत एक पॉझिटीव्ह रुग्ण नसतांना नगराध्यक्षा पुष्पलता पाटील, माजी आमदार साहेबराव पाटील व पालिकेचे आरोग्य कर्मचारी जोरदार कामास लागले होते. त्यांनी अहोरात्र काम करून कोरोना न प्रवेश करण्यापूर्वी खूप प्रयत्न केले.

    याठिकाणी सोयी सुविधा उपलब्ध असल्याचा दावा कोरोनामुक्त रुग्णांनी केला आहे. तरीही टीका होत आहे जे चुकीचे आहे येथील रुग्णांना शासकीय डॉक्टरांनी सहकार्य केले.त्यामुळे रुग्ण झटपट बरे होऊ लागले आहेत. जळगावला वेगळी परिस्थिती होती. इथे अँटिजेन चाचणी घेऊन तातडीने रिझल्ट्स कळत आहेत. झटपट स्वॅप घेऊन त्याला ताबडतोब रिझल्ट् कळत आहेत. निगेटिव्ह रुग्णांची लगेच सुटका होत असल्याने कोरोना केअर सेंटर मध्ये फक्त पॉझिटिव्ह रुग्ण आढळून येत आहेत.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मालेगाव नंतर अमळनेरचा नंबर लागला आहे. महाराष्ट्रात गाजले मात्र जिल्ह्यात सर्वात आधी कोव्हीड केअर सेंटर उघडून दिलासा लाभला. व झटपट रुग्ण मोकळे पण होऊ शकले.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email

    Related Posts

    स्व डॉ. चारुदत्त साने यांच्या जयंतीनिमित्त रविवारी मोफत रोगनिदान शिबीराचे आयोजन

    September 4, 2026

    बी.एन. अग्रवाल कन्स्ट्रक्शनचे निकृष्ठ काम चव्हाट्यावर!

    September 4, 2026

    यावलच्या सोनाली तायडे यांचा बेस्ट बिझनेस अँड ब्युटी आर्टिस्ट अवॉर्डने सन्मान

    September 3, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif