अमळनेर (प्रतिनिधी):- शहरातील प्रभाग क्रमांक चौदा मधील गुरुकृपा कॉलनी, सुरभी कॉलनी, शाहू नगर, विद्याविहार कॉ, प्रसाद नगर, ओमशांती नगर इ.भागातील नागरिकांना पावसाळ्यात परिसरातून येण्यासाठी चिखलामुळे खूप त्रास होतो. ही समस्या प्रभागातील नगरसेविका कमलबाई पितांबर पाटील तसेच सामाजिक कार्यकर्ते रवि पाटील यांच्या लक्षात आले असता त्यांनी माजी आमदार कृषीभूषण साहेबराव पाटील तसेच नगराध्यक्ष पुष्पलता साहेबराव पाटील तसेच मुख्याधिकारी डॉ.विद्या गायकवाड यांच्याकडे रस्त्याची समस्या मांडली.
यावेळी नगराध्यक्षांनी तत्काळ ही समस्या सोडवण्यासाठी मुरूम टाकण्यास सांगितले.मुरूम टाकल्याने प्रभागातील नागरिकांची रस्त्यात येणाऱ्या अडचणी दूर झाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले. तसेच ओमशांती नगराकडे जाणाऱ्या रस्त्यावर बंद असलेल्या पथ दिव्यांची देखील दुरुस्ती करण्यात आली.