अमळनेर | येथील संत सखाराम महाराज संस्थानतर्फे द्विशताब्दी समाधी सोहळ्यासाठी बोरी नदि पात्रातील भव्य मंडप रविवारी झालेल्या वादळी वाऱ्याने कोसळला. गेल्या २ महिन्यांपासून या भव्य मंडपाची ऊभारणीचे काम सुरु होते. सोहळा अवघ्या ८ दिवसांवर आलेला असतांना निसर्गाच्या अवकृपेने क्षणात कोसळल्याने भविकांचा चांगलाच हिरमोड झाला आहे.
या सोहळ्यासाठी अमळनेरमधील वाडी संस्थानात जय्यत तयारी सुरू झाली होती. हा सोहळा २१ ते २९ एप्रिल दरम्यान पार पडणार होता. दरम्यान या सोहळ्यासाठी विविध भागामधून मोठ्या प्रमाणावर भाविक गण येणार असल्याने त्यासाठी नदीपात्रात भव्य पारायणं मंडप, महायज्ञ कुंड, भक्त निवास तसेच विविध सोयी सुविधा लाकडी दांड्या बांबूच्या सहाय्याने आकर्षक मंडप ऊभारला होता मात्र रविवारी रात्री झालेल्या वादळात तो कोलमडून पडला आता नविन ऊभारणी साठी वेळही नाही मात्र त्यावर मात करण्यासाठी भविक सरसावले आहेत.