अमळनेरात शेतकरी संघटनेतर्फे दूध ,भाजीपाला फेकून रास्तारोको

0

अमळनेर : येथील शेतकरी संघटनेतर्फे विविध मागण्यांसाठी आंदोलन आज सकाळी बळीराजा स्मारकाजवळ रास्तारोको करून करण्यात आले . यावेळी भाजीपाला ,दूध फेकून शासनाचा निषेध करण्यात आला .

यावेळी विविध मागण्यांचे निवेदन उपविभागीय अधिकारी संजय गायकवाड यांना देण्यात आले .
यावेळी शासना विरोधात घोषणा देण्यात आल्या .आंदोलनात संदीप पाटील,धनगर पाटील,गोकुळ पाटील,अनंत निकम,सचिन पाटील,शिवाजी पाटील,अड गिरीश पाटील,संजय पुनाजी पाटील,सुरेश पाटील,प्रा सुभाष पाटील,सुलोचना वाघ आशा चावरिया यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते . पोलीस निरीक्षक अनिल बडगुजर , स पो नि एकनाथ ढोबळे ,प्रवीण पारधी , सचिन पाटील, भूषण पाटील यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.

Leave A Reply

Your email address will not be published.