Thursday, September 29, 2022

अमळनेरात पत्रकार संघातर्फे 6 रोजी पत्रकार दिन सोहळा

- Advertisement -

अमळनेर- येथील अमळनेर शहर व तालुका पत्रकार संघटनेच्या वतीने आद्य पत्रकार दर्पणकार बाळशास्त्री जांभेकरजी यांच्या जयंतीनिमित्त पत्रकार दिन सोहळ्याचे आयोजन सोमवार दि 6 जानेवारी रोजी अमळनेर शहरातील न्यू प्लॉट भागातील श्री शिवाजी महाराज उद्यानात करण्यात आले आहे.

- Advertisement -

सकाळी 10 वा.हा पत्रकार दिन सोहळा होणार असून यावेळी दर्पणकार बाळशास्त्री जांभेकरजी यांच्या प्रतिमेचे सामूहिक पूजन व माल्यार्पण केले जाणार आहे.याप्रसंगी सर्व लोकप्रतिनिधी,राजकिय व सामाजिक क्षेत्रातील मान्यवर,डॉक्टर्स,व्यापारी बांधव,शासकीय अधिकारी आणि हितचिंतक व प्रेमी मंडळींची उपस्थिती लाभणार आहे.तरी शहर व तालुक्यातील सर्व पत्रकार बांधवांनी यावेळी आवर्जून उपस्थित राहावे असे आवाहन अमळनेर शहर व तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष,सचिव आणि सदस्यांनी केले आहे.

- Advertisement -

- Advertisement -
spot_imgspot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

हे वाचायलाच हवे

संबंधित बातम्या