अमळनेरात नगराध्यक्षांच्या खुर्चीला हार

0

अमळनेर :- शहरात आज पिण्याच्या पाण्याची जी बिकट परिस्थिती झाली आहे.त्यात वैयक्तिक राजकारण करून अमळनेरच्या जनतेस वेठीस धरत असून.त्याला नगराध्यक्षा व त्यांचे पती माजी आमदार जबाबदार आहेत.यामुळे त्यांनी तात्काळ राजीनामा द्यावा अशा मागणी चे निवेदन सुरवतीला नगराध्यक्ष यांच्या खुर्चीवर ठेवून हार घालून दिले व नंतर मुख्याधिकारी शोभा बाविस्कर यांच्या कडे सत्ताधारी नगरसेवक व नगरसेविका यांनी निवेदन दिले.

सदर निवेदनात नगराध्यक्षांना माहीत असुन तिसरे आवर्तन मिळणार नाही तरी दुसरी उपाययोजना केली नाही.,पाणी टंचाईच्या काळात शासनाकडे नवीन योजने साठी एकही ठराव पाठवला नाही,पाणीपुरवठा अधिकारी व कर्मचारी जानेवारी पासुन दोन दिवस वाढवण्यास सांगत होते, त्यांचे ऐकल नाही,दुष्काळ असुन पाणीपुरवठा यंत्रणा पुर्णत: कोलमडली असुन 10 ते 15 दिवसात पाणी येत आहे. तरीही नगराध्यक्षा एकही दिवस नगरपरिषदेत येत नाही,मुंदडा नगरच्या पाण्याच्या टाकीवरुन मंगरुळ गावाला पाणी देण्याचा ठराव मंजुर करून दिला, जिवणधारा ह्या खाजगी कंपनीला मुख्यवाहिनी वरून कनेक्शन देऊन तेथे 70% फिल्टर केलेले पाणी वाया जात आहे, वैयक्तिक लाभासाठी अतिक्रमण रोखण्याचे चुकीचे ठराव करून सर्व नगरसेवकांचा बळी दिला , नगरसेवक स्व खर्चाने टँकर मागवून पाणी वाटप करत असुन न. पा. चे ट्रॅक्टर उभे करून ठेवणे, नगराध्यक्षांची पाण्याची एवढी बिकट परिस्थिती असतांनाही एकही दिवस जळोद व कलाली येथे भेट नाही ,उपनगराध्यक्ष सहा सहा महीने ठरल्याप्रमाणे न वागल्यामुळे ,आयत्या वेळच्या विषयात अ,ब, क, असे ठराव करून दोन ते तीन कोटीची कामे मंजुर करणे,आजी व माजी आमदारांच्या वैयक्तिक भांडणामुळे विकासकामांवर होणारा परिणाम वनागरिकांचे होणारे नुकसान ,वाढीव घरपट्टी ठराव करूनही त्याच्यावर अंमलबजावणी न झाल्यामुळे अमळनेरकरांना वाढीव घरपट्टी भरावी लागली.

आयत्या वेळी खोटे ठराव करून न झालेल्या कामांची बिले काढणे,मागच्या वर्षी पावसाळ्यात नगरपरिषदेचा मुरूम खाजगी जागेत साठवून दुसर्या रस्त्यांच्या कामांवर वापरणे,कॉटन मार्केट समोरील शॉपिंग सेंटर मध्ये जास्तीचे पैसे घेऊन पावती कमी देऊन दुकान विकणे,हेंगडेवार शॉपिंग सेंटर मधील दुकांदारांकडून जास्तीचे बांधकाम करून देऊ, यासाठी स्वत:चा फायदा करून घेतला, नगरसेवकांचे फोन न उचलणे,एलईडी लाईट, फवारणी ट्रॅक्टर, गउइ मशीन ई. वस्तु घरात किंवा घराच्या बाजूला स्वत:च्या नियंत्रणाखाली ठेवणे,माजी आमदारांची इच्छा असेल तर त्या गल्लीमध्ये एका दिवसात रस्ता, स्ट्रीट लाईट, पाईप लाईन ई. सुविधा देतात, नगरसेविकांचे पुत्र व त्यांचे झ.-. यांना कामे देऊन निष्कृष्ट दर्जाची कामे करणे,अधिकारी व कर्मचार्यांना सक्ती दिली असुन नगरसेवकांचे ऐकायचे नाही,
पावसाळ्यात नागरिकांना चालण्यासाठी रस्ते नाहीत व त्यावर कोणतीही अंमलबजावणी नाही, शॉपिंग सेंटर मधील राखीव दुकाने जवळच्या माणसाचे ऐकुन फेरफार करून विकुन मलिदा खाणे, विकास कामांसाठी नगरविकास खात्याकडे एकही ठराव न पाठवणे,चुकीच्या ठरावांवर सह्या न केल्यास किंवा विरोध केल्यास नगरसेवकांना तुमच्या प्रभागात कामे होऊ देणार नाही असे धमकावणे,मीटिंग घेण्या अगोदर नगरसेवकांना विश्वासात न घेणे,काही प्रभागात नागरिकांना चालण्यासाठी खडीचे मुरूमचे साधे रस्ते नाहीत आणि काही प्रभागात सिमेंटच्या रस्त्यावर सिमेंटचे रस्ते तयार केले जात आहे, नगरसेविका, नगरसेवक नागरिकांच्या समस्या घेऊन किवा नागरिक स्वता त्यांच्या समस्या घेऊन नगरपरिषदेत जातात तेथे नगराध्यक्षा नसल्यामुळे त्यानां व त्यांच्या पतीनां फोन केला तर ते त्यांच्या घरी बोलवून अश्शील शब्द बोलून अपमानास्पद वागणूक देतात,पाण्याचे नियोजन नाही अनियमित व कमी दाबाने पाणी पुरवठा काही भागात अर्धा तास तर काही भागात 8 ते 10 तास पाणी पुरवठा केला जातो.अशा विविध विषयांनाचे निवेदन मा.जिल्हाधिकारी जळगाव, ना.पालकमंत्री जळगाव यांना देणार असून सदरच्या निवेदनावर नगरसेविका रत्नमाला साखरलाल महाजन, कमलबाई पितांबर पाटील, शितल राजेंद्र यादव, संगीता संजय पाटील, नूतन महेश पाटील, राधाबाई संजय पवार नगरसेवक प्रताप अशोक शिंपी, सुरेश आत्माराम पाटील, संतोष भगवान पाटील, घनश्याम जयंत पाटील, संजय महादू भिल इ.च्या स्वक्षरया आहेत.तरीही त्यांनी राजीनामा दिला नाही तर प्रत्येक प्रभागातून भव्य मोर्चा काढण्यात येईल असा इशाराही देण्यात आला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.