अमळनेर(प्रतिनिधी) : प्रशासनाने अमळनेरात २० मार्च ते २२ मार्च दरम्यान लॉकडाऊन ची घोषणा केलेली आहे.याचाच भाग म्हणून सलग दुसऱ्या दिवशी बंद यशस्वी करण्यात आला.
दुचाकीस्वार मात्र शहरात फिरतच होते.त्यामुळे वाहतूक काही प्रमाणात दिसत होती.टोळक्या टोळक्याने कॉलनी भागात नागरिक गप्पा करण्यात व्यस्त होते.व्यवहार मात्र पूर्णपणे ठप्प होते.व्यापारी वर्गाने बंद यशस्वी करण्यात महत्वाची भूमिका निभावली.बसस्टँड परिसरात नागरिकांची गर्दी पाहायला मिळत होती.खाजगी वाहतूक करणारी वाहने काही प्रमाणात सुरू होती.