Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • आदिवासी लोक संघर्ष मोर्चाला किती ताण देणार?
    • दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांची दिवाळी तुटपुंज्या मदतीत!
    • एका धडकेत सहा जीव संपले; तीन चिमुकल्यांचाही दुर्दैवी अंत!
    • मसाल्यांतील भेसळीविरुद्ध राज्यभर कठोर कारवाईचे आदेश!
    • पाचोऱ्यात हातमजुराचा आर्थिक विवंचनेतुन गळफास
    • अदानी-अंबानींचे २० लाख कोटी रुपयांचे कर्जमाफी मग..
    • एसटी तोट्यात, तरी भाडेवाढीचा भार टाकणार नाही!
    • वाचनातून व्यक्तिमत्व सर्जनशील होते : चंद्रकांत चव्हाण
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»ताज्या बातम्या»अमळनेरात कोरोनाचा कहर
    ताज्या बातम्या

    अमळनेरात कोरोनाचा कहर

    By May 7, 2020No Comments2 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email
    प्रशासन आणि लोकप्रतिनिधीचे जनतेला ५ दिवस जनता कर्फ्यु चे आवाहन
    अमळनेर (प्रतिनिधी)
     अमळनेर शहरात एकाच वेळी १९ रुग्ण पॉझिटिव्ह सापडल्यामुळे प्रशासन खडबडून जागे झाले आहे.कालच जिल्हाधिकारी यांनी आढावा घेतलेला असतांना अचानक रुग्णांची एवढी मोठी वाढ होणे हे देखील चिंतेच कारण आहे.त्यातच रेड झोन मध्ये असुन सुद्धा मद्य विक्रीची परवानगी देऊन चूकच झाली याची जाणीव आता नक्की होत असेल. कधी नव्हे एवढी गर्दी ऐन लॉकडाऊन च्या काळात मद्य विक्री सुरू झाल्यानंतर शहरात झाली.
       आता अमळनेर तालुक्यात एकूण ४६ रुग्ण असून यातील ७ मयत झालेत तर २ रुग्ण बरे देखील झालेत.परंतु रुग्ण संख्या आटोक्यात येण्यासाठी प्रशासन आता बैठकांवर बैठका घेत आहेत.
    लोकप्रतिनिधीचे जनतेला जनता कर्फ्यु चे आवाहन
     याच प्राश्वभूमीवर  लोकप्रतिनिधींमार्फत पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते त्यात ७ तारखेपासून ते ११ तारखेपर्यंत पाच दिवस जनता कर्फ्यु च नियोजन करण्यात आले आहे.शहरातील सर्वच आजी माजी लोकप्रतिनिधी, नगरसेवक यांनी जनतेला आवाहन करून खबरदारी घेण्यास आपल्या पद्धतीने सांगावे.या जनता कर्फ्यु च्या काळात फक्त वैद्यकीय सुविधा उपलब्ध असतील अस प्रशासनातर्फे सांगण्यात आलं.तसेच बाजार समिती, भाजीपाला, फेडरेशन,पेट्रोल पंप,किराणा दुकान सर्वच बंद असेल.फक्त पोलीस प्रशासनाला दोष न देता नागरिकांनी आपली काळजी स्वतः घेतली पाहिजे.
       अमळनेर येथील कोविड सेन्टर च्या माध्यमातुन काही रुग्णांवर येथेच उपचार केले जातंय.तसच आमदार अनिल पाटील यांच्या आवाहनामुळे खाजगी डॉक्टर देखील रुग्णांना  आपली सेवा देत आहेत.सर्वच लोकप्रतिनिधी संकटाच्या काळात एकत्र आलेले दिसत आहेत.जर जनता कर्फ्यु च पालन काटेकोर झालं नाही तर हीच संख्या १००-१२५ च्या घरात गेल्याशिवाय राहणार नाही ही देखील खंत व्यक्त करण्यात आली.विनाकारण बाहेर फिरणाऱ्यांवर कठोर कार्यवाही केली जाणार आहे.ग्रामीण भागात देखील मोठ्या प्रमाणात पुणे,मुंबई, सुरत येथून येणाऱ्या लोकांचे लोंढे थांबायचं नाव घेत नाहीयेत,  तरी गावातील प्रशासनाने योग्य ती काळजी घ्यावी  व त्यांना शाळांमध्ये क्वारनटाईन करण्यात यावे असे आदेश देण्यात आले.
    पत्रकार परिषदेला आमदार अनिल पाटील,आमदार स्मिताताई वाघ ,माजी आमदार साहेबराव पाटील, शाम अहिरे यांची उपस्थिती होती.

    https://lokshahilive.com/wp-content/uploads/2026/09/WhatsApp-Video-2026-09-16-at-10.29.50-PM.mp4

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email

    Related Posts

    जळगावात उभारणार ‌‘रेडक्रॉस सावली केअर सेंटर‌’!

    October 10, 2026

    योग्य नियोजनाने दुष्काळावरही मात करू!

    October 10, 2026

    मुक्ताईनगर ड्रोन प्रकरणाचा उलगडा; रेकी नव्हे, ते प्रशिक्षण विमान!

    October 10, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif