अमळनेरला काँग्रेसतर्फे शेतकरी सन्मान मेळाव्याचे आयोजन

0

अमळनेर (प्रतिनिधी):-दिल्ली येथे सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनास पाठींबा दर्शविण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या  आदेशान्वये , अमळनेर तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने शेतकरी सन्मान मेळाव्याचे बुधवार दि 10/02/2021 रोजी दुपारी 1:00 वाजता आयोजन केलेले आहे. सदर मेळाव्यात केंद्राचे “तीन काळे कृषी कायदे ” शेतकरी वर्गासाठी कसे घातक आहेत या विषयावर मेळाव्यात मार्गदर्शन करण्यात येणार आहे. तरि तालुक्यातील शेतकरी बांधवांनी आंदोलनास पाठींबा दर्शविण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे हि विनंती.

प्रमुख वक्ते – 

1) डाॅ उल्हासदादा पाटील (माजी खासदार)

2) श्री एस बी नाना पाटील (शेतकरी नेते)

व इतर स्थानिक नेते उद्बोधन करणार आहेत. या मेळाव्यास उपस्थितीचे आवाहन जळगाव जिल्हा महिला काँग्रेस अध्यक्षा श्रीमती सुलोचना वाघ , किसान काँग्रेस जिल्हाध्यक्ष कृषिभुषण सुरेश पाटील, अमळनेर काँग्रेस कमिटीचे तालुकाध्यक्ष गोकुळ बोरसे, शहराध्यक्ष मनोज पाटील, युवक काँग्रेस अध्यक्ष महेश पाटील, शहराध्यक्ष तौसिफ तेली, शहरकार्याध्यक्ष कुणाल चौधरी, किसान काँग्रेस तालुकाध्यक्ष प्रा सुभाष पाटील, अल्पसंख्याक सेल तालुकाध्यक्ष अलिम मुजावर, शहराध्यक्ष जुबेर पठाण, जेष्ठ नेते धनगर पाटील, डॉ अनिल शिंदे यांनी केले आहे. तरि अधिकाधिक संख्येने शेतकरी बांधव व काँग्रेस प्रेमी जनतेने उपस्थिती द्यावी.

Leave A Reply

Your email address will not be published.