जळगाव : जिल्ह्यातील दोन्ही लोकसभा मतदार संघात आज सकाळी ७ वाजेपासून जिल्हयातील एकूण 3 हजार 200 मतदान केंद्रावर मतदान सुरु आहे. जळगाव मतदार संघातून 14 तर रावेरमधून 12 उमेदवार निवडणूक रिंगणात असून 26 उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रात बंद झाले आहे. दरम्यान, यावल येथील बालसंस्कार विद्यामंदिरातील मतदान केंद्रात मतदान सुरू होण्याआधीच ईव्हीएम मशीन सुमारे एक तास बंद पडल्याने मतदारांना रांगेत ताटकळत उभे राहावे लागले. दुसरे ईव्हीएम मशीन आले त्यानंतर मतदान सुरू झाले
चोपडा तालुक्यातही दोन केंद्रांवर मतदान यंत्रात तांत्रिक बिघाडामुळे उशिराने मतदान सुरू झाले. तर अमळनेर येथे जी एस हायस्कूल मतदान केंद्रावर 20 मिनिटे उशिराने मतदान सुरू झाले होते. राज्यात सर्वाधिक ईव्हीएम बिघाडाच्या तक्रारी माढ्यातून समोर आल्या तक्रारी आहेत.
Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Next Post