अमळनेर(प्रतिनिधी) : अमळनेरकरांनो आपल्याला कम्फर्ट झोन मध्ये राहायचं आहे, त्यासाठी कोरोना विरुद्धची लढाई आपल्याला जिंकावीच लागेल.आपण जर शहाणे झालो नाहीत, विचारानं वागलो नाहीत, तर परिस्थिती गंभीर होऊ शकते.
येणारे दिवस आपल्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत, कोरोणाची गंभीरता समजून घ्या,आपण कोरोनाचं संकट गंभीरपणे घेत नाही..!याला नक्की काय म्हणायचं..? आता शहाणे व्हा..! गोतास काळ होऊ नका ..! जरा विचाराने वागा..! रात्र वैऱ्याची आहे आणि तुम्हीच तुमच्या आयुष्याचे रखवालदार आहात ..! तुम्ही जगा आणि इतरांनाही जगू द्या ..!
आपण सांभाळून राहिलो तरच आपण कोरोनाला रोखु शकतो, आपली थोडीशी चूक गंभीर परिणामाला कारणीभूत ठरू शकते, आपण एका सुशिक्षित शहरात राहतोय, आपण जबाबदार नागरिक आहोत हे सोशल डिस्टंसिंग ठेवुन व विनाकारण घराबाहेर न पडून सिद्ध करण्याची जबाबदारी आता नागरिकांची आहे..! तुम्हा सर्वांना आवाहन करतो की आपल्याला सोशल डिस्टन्स ठेवुन व विनाकारण घराबाहेर न पडून आपले शहर कोरणा मुक्त करायचे आहे.
“कोरोनाला बंदिस्त करायला लसीकरण हा उपाय आहे, लसीकरण जास्तीत जास्त लोकांचे आणि वेगवान केले पाहिजे. लहान मुलांनाही आपल्याला जपावे लागेल आताच्या कोरोनाच्या लाटेत लहान मुलांनाही लागण होत आहे. प्रत्येकाने खबरदारी घ्या,काळजी घ्या, घरात थांबा, प्रशासनाच्या सूचनांचे पालन करा.”
कल्याण साहेबराव पाटील
-कार्याउपाध्यक्ष खा.शि.मंडळ, अमळनेर