अमरावती येथे जमाव बंदीला नागरिकांकडून खो ; शहरात सर्वत्र गर्दीने हाउसफुल

0

अमरावती (प्रतिनिधी) : अमरावती जिल्हा प्रशासनाने कोरोना प्रतिबंधात्मक उपाय योजनेअंतर्गत कलम 144 अन्वये जमाव बंदी लागू केली आहे. मात्र अमरावती शहरात या आदेशाला नागरिकांकडून सर्रासपणे खो दिले असल्याचे चित्र आहे . एसटी आगार , सर्वच रस्ते, बाजारपेठा, ऑटो रिक्षा गर्दीने तुडुंब असून अशा स्थितीत प्रशासनाकडून योजण्यात आलेल्या उपाययोजना नागरिकांकडून प्रतिसाद मिळत नसल्याने कोरोनाचि  स्थिती आणखी धोकादायक वळणावर जाण्याची चिन्हे आहेत.

कोरोना रुग्ण संख्येमध्ये कमालीची वाढ होत असल्याने प्रशासनाच्या तोंडचे पाणी पळाले आहे. दररोज साडेतीनशे ते चारशे नवीन रुग्ण आढळून येत आहेत . खबरदारीचा उपाय म्हणून सर्व शाळा महाविद्यालय 28 फेब्रुवारीपर्यंत बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहे . गर्दी जमू नये म्हणून जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी जिल्ह्यात कलम 144 लागू केले असून . या कलमानुसार सार्वजनिक ठिकाणी पाच व्यक्तींपेक्षा अधिक व्यक्ती आढळून आल्यास त्यांच्यावर फौजदारी कारवाई करण्यात येऊ शकते . मात्र दुसरीकडे शहरातील मध्यवर्ती एसटी आगार , जयस्तंभ चौक, सराफा, राजकमल चौक, इतवारा, तसेच इतर वर्दळीच्या ठिकाणी सकाळपासूनच नागरिकांची गर्दी होत आहे . शहरातील ऑटोरिक्षा मध्ये आठ ते दहा प्रवासी भरण्यात येत आहे . बहुतांश ऑटोचालक तसेच प्रवासी तोंडाला मास्क, किंवा कापड न बांधताच प्रवास करीत आहेत . त्याकडेही वाहतूक पोलिसांचे दुर्लक्ष दिसून येत असल्याचे चित्र आहे . प्रशासनाकडून खबरदारीच्या उपाययोजना योजना करण्यात येत आहे . सोशल डिस्टंसिंग , मास्क , सॅनिटायझर टायझर चा वापर या त्रिसूत्रीचा अवलंब करणे नागरिकांचे कर्तव्य आहे  . नागरिकांनी गंभीरपणे या त्रिसूत्रीचा वापर केल्यास कोरोनाला आपण हरवू शकतो अशी माहिती जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी दिली  आहे.

अमरावती जिल्ह्यात कोरोणा रुग्णांची आकडेवारी सातत्याने वाढत असून .16 फेब्रुवारी मंगळवारि एकाच दिवशी तब्बल 485 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहे . व कोरोनामुळे तिघांचा मृत्यू सुद्धा झाला आहे . पॉझिटिव्ह रुग्णां सोबतच मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या सुद्धा वाढलेली असल्याने चिंतेत अधिक भर पडली आहे . दररोज तीन ते चार रुग्णांच्या मृत्यूची नोंद होत आहे . रुग्णांची संख्या 1516 असून बरे होण्याचे प्रमाण 92. 53 टक्के इतके आहे . मृत्युदर 1. 69 असल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात येत आहे . यापैकी अनेक रुग्ण हे होम आयसोलेशन मध्ये असून आयसोलेशन चे नियम अधिक कठोर करण्याची पावले प्रशासनाकडून उचलण्यात येत आहे .

 

Leave A Reply

Your email address will not be published.