अमरावती :- एकतर्फी प्रेमातून प्रियकरानं एका तरुणीची हत्या केल्याची धक्कादायक घटना अमरावतीच्या चुनाभट्टी परिसरात घडली आहे. किरण म्हस्के असे आरोपीचे नाव असून त्याने १७ वेळा चाकूने वार करून तरुणीची हत्या केली. दरम्यान, आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
दुपारी तीनच्या सुमारास 17 वर्षीय तरुणी आपल्या मैत्रिणींसह ट्यूशनला जात होती. त्यावेळी आरोपी किरण म्हस्के याने १७ वेळा चाकूने वार करत तरुणीची हत्या केली. या घटनेनंतर तरुणीला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात नेण्यात आलं, पण उपचारा दरम्यान तिचा दुर्देवी मृत्यू झाला. या गटनेत तरुणीच्यासोबत असलेली मैत्रिणीसुद्धा जखमी झाली. युवतीच्या हत्येमुळे तिच्या नातेवाईकांनी जिल्हा रुग्णालयात आक्रोश केला. जिल्हा रुग्णालयात तणाव वाढल्याने पोलिसांनी तगडा बंदोबस्त तैनात केला.
यावेळी आरोपी किरण मस्केने पळ काढण्याचा प्रयत्न केला पण तो त्याचा प्रयत्न फसला. अमरावतीकरांनी त्या पळ काढताना पाहिले आणि पकडून त्याला बेदम चोप दिला. नंतर आरोपीला त्यांनी पोलिसांच्या ताब्यात दिलं.