अभूतपूर्व ! भादली येथील ग्रामपंचायत निवडणुकीत तृतीयपंथी अंजली पाटील विजयी

0

जळगाव प्रतिनिधी | राज्यात ग्रामपंचायत निवडणुकींचा निकाल आज जाहीर होत आहे. अनेक ठिकाणी दिग्गजांच्या विजय-पराजयाची चर्चा माध्यमांत रंगल्या आहेत. मात्र अशात एका विशेष उमेदवाराच्या विजयाने सर्वांचे लक्ष्य वेधून घेतले आहे. जळगाव जिल्ह्यातील भादली बुद्रुक या गावातील अंजली पाटील यांचा तृथीयपंथी म्हणुन ज्यांचा अर्ज नाकरण्यात आला होता. मात्र आज जाहीर झालेल्या निकालात अंजली पाटील यांनी विजय मिळविला आहे. यामुळे त्या जिल्ह्यातील पहिल्या तृतीयपंथी लोकप्रतिनिधी बनल्या आहेत.

तालुक्यातील भादली बुद्रुक येथील वॉर्ड क्रमांक चारमधून तृतीयपंथी अंजली पाटील ( अंजली जान गुरू संजना जान) यांनी महिला राखीवमधून अर्ज भरला होता. मात्र त्यांचा अर्ज तहसील कार्यालयाने नाकरल्याने त्यांनी न्यायालयात धाव घेतली होती. तेथून त्यांना महिला वर्गवारीत अर्ज भरण्याची परवानगी मिळाली होती. यानंतर त्यांनी अतिशय जोमाने प्रचार केला. वंचित बहुजन आघाडीच्या युवा जिल्हाध्यक्षा शमिभा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी केलेल्या प्रचाराला आता यश लाभले आहे.

आज सकाळी झालेल्या मतमोजणीतून वॉर्ड क्रमांक चारमधून अंजली पाटील या विजयी झाल्या आहेत. त्या जिल्ह्यातील पहिल्या लोकप्रतिनिधी बनल्या आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.