नवी दिल्ली | बॉलिवूड अभिनेत्री अमिषा पटेलविरुद्ध रांची कोर्टाने अटक वॉरन्ट जारी केला आहे. निर्माता अजय कुमार यांनी अमिषा पटेलवर चेक बाउन्सचा आरोप लावला आहे. अजय यांनी आरोप लावला की, त्यांनी 2018 मध्ये ‘देसी मॅजिक’ सिनेमा बनवण्यासाठी अमीषा पटेलला 3 कोटी उधार दिले होते. यानंतर त्यांनी अमीषाला पैसे मागितले तेव्हा तिने ते देण्यास टाळाटाळ केली. पैसे मागितल्यावर ती कोणतीच प्रतिक्रिया देत नव्हती.
हा सिनेमा फ्लॉप झाला. यानंतर प्रोड्यूसरने पैसे मागितले. अमीषाने अडीच कोटींचा चेक यावेळी दिला. मात्र त्यांनी बँकेत हा चेक भरला तेव्हा चेक बाउन्स झाला. याच प्रकरणी अमीषा विरुद्ध रांची कोर्टात फसवणूकीचा खटला सुरू आहे. अजयने सांगितले की, तक्रार नोंदवल्यापासून आतापर्यंत मी अनेक वेळा अमीषासोबत संपर्क करण्याचा प्रयत्न केला. मात्र तिने एकदाही रिस्पॉन्स दिला नाही. यानंतर अमीषाला समन्स बजावण्यात आला. पैशांविषयी कोर्टात कारवाईही सुरू होती. अडीच कोटींच्या फसवणुकीच्या आरोपांमुळे चर्चेत असलेली अभिनेत्री अमीषा पटेल आपल्या काळात बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री होती.