जळगांव : येथील रोटरी क्लब ऑफ जळगाव सेंट्रल तर्फे आयोजित कार्यक्रमासाठी जेष्ठ चित्रपट अभिनेते व प्रसिद्ध मानसोपचार तज्ञ डॉ.मोहन आगाशे हे 9 फेब्रुवारी रोजी जळगांवात येत आहे.
छत्रपती संभाजी राजे नाट्यगृहात रविवार दि. 9 रोजी सकाळी 10 ते 1 या वेळेत रोटरी सेंट्रल तर्फे सर्वश्रेष्ठ राष्ट्रीय पुरस्कार व राष्ट्रपती सुवर्ण कमळ पुरस्कार प्राप्त ‘कासव’ या चित्रपटाचे आयोजन करण्यात आले आहे. चित्रपटानंतर डॉ.आगाशे हे उपस्थितांसमवेत संवाद साधणार आहे.
आजच्या तणाव युक्त जीवनशैली नैराश्य ही मोठी समस्या असून त्यावर प्रबोधन करणारा हा चित्रपट असून तो सर्वांसाठी विनामुल्य आहे. त्यासाठी प्रवेशिका निपुण पॅथॉलॉजी लॅब्रोरेटरी, ओरीऑन शाळेसमोर, एम.जे.कॉलेजजवळ, जळगाव या ठिकाणी उपलब्ध आहे. मोठ्या संख्येने उपस्थिती द्यावी असे आवाहन रोटरी सेंट्रलचे अध्यक्ष डॉ.राहुल मयुर व मानद सचिव सुशील राका यांनी केले आहे