अपर पोलीस अधिक्षक लोहित मतानी यांची बदली

0

जळगाव :- राज्यातील एकुण 37 पोलीस अधिकार्‍यांच्या बदल्या व नियुक्ती गृह खात्याकडून करण्यात आलेल्या आहेत. जिल्ह्याचे अपर पोलीस अधिक्षक लोहित मतानी यांची बदली अमरावती येथे राज्य राखीव पोलीस बलाचे समादेशक म्हणून नियुक्ती केली आहे. तर त्यांच्या जागी सहाय्यक पोलीस अधिक्षक भाग्यश्री नवटके यांची पदोन्नतीने नियुक्ती करण्यात आली आहे.

वादग्रस्त महिला अधिकारी 

अ‍ॅट्रोसिटी दाखल करण्यासाठी आलेल्या दलित-मुस्लिम लोकांना फोडून काढण्याची भाषा करणार्‍याची व्हिडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर माजलगावच्या तत्कालीन पोलीस उपअधीक्षक भाग्यश्री नवटके यांची पोलीस प्रशासनाने औरंगाबादला बदली केली होती. त्यानंतर सोमवारी पोलीस प्रशासनाने काढलेल्या आदेशानुसार नवटके यांची जळगाव अपर पोलीस अधीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. डिसेंबर 2018 मध्ये बीड जिल्ह्यातील माजलगाव या ठिकाणी कार्यरत असताना महिला आयपीएस अधिकारी भाग्यश्री नवटाके यांना दलित बांधवांबाबत वादग्रस्त वक्तव्य करणे भोवले होते. त्यानंतर राज्यात मोठे वादळ उठल्यानंतर त्यांची बदली औरंगाबादला करण्यात आली होती. त्यांच्या संदर्भातली एक व्हायरल क्लिप समोर आली होती.

Leave A Reply

Your email address will not be published.