अपघातातील जखमी तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू

0

जळगाव | अज्ञात वाहनाच्या धडकेत गंभीर जखमी झालेल्या तरुणाचा आज सकाळी उपचारादरम्यान मृत्यू झाला. नथ्थू जनार्दन कांडेले (वय 32, रा तांदळवाडी) असे तरुणाचे नाव आहे.

गुरुवारी 22 ऑगस्ट रोजी सायंकाळी ५.३०च्या सुमारास तांदलवाडी येथून गोरगावले जात असतांना चिंचोली गावाजवळ अज्ञात वाहनाने धडक दिली होती. त्यात नथ्थू कांडेले हा जखमी झाला होता. त्यांना तातडीने जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. आज सकाळी ८.३० वाजेच्या सुमारास उपचारादरम्यान मृत्यू झाला. याबाबत जळगाव शहर पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. पुढील तपास पोहेका संजय झाल्टे आणि पोका विजय जाधव करीत आहे. मयताच्या पश्चात पत्नी, दोन मुले, आई, दोन भाऊ, चार बहिणी असा परिवार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.