अपघातग्रस्तांना मदत करा व वाहतुकीचे नियम काटेकोरपणे पाळा

0

अमरावती, लोकशाही न्यूज नेटवर्क 

जिल्ह्यातील मार्गावरील वाहतूक करत असताना प्रवासादरम्यान दुचाकी चालकांनी हेल्मेटचा वापर करावा, तसेच चार चाकी वाहन चालकांनी सीट बेल्टचा वापर करावा असे आवाहन वाहतूक महामार्ग सुरक्षा पोलिस सहाय्यक पोलीस निरीक्षक वैशाली आठवले यांनी आवाहन केले.

नांदगाव पेठ येथील टोल नाका परिसरात राष्ट्रीय महामार्गावर वाहनचालकांना त्यांनी विशेष मार्गदर्शन केले.  याप्रसंगी वाहनचालकांनी अपघात ग्रस्तांची मदत करावी तसेच वाहन चालवत असताना वाहतुकीच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे. तर वाहतुकीचे पालन न करण्याऱ्यावर दुप्पट दंड आकाराला जाईल याची काळजी वाहन चालकांनी घेणे महत्वाचे आहे.

तर वाहनांचा विमा, पियुसी, लायसन सोबत ठेवावे तसेच अपघातग्रस्तांना तात्काळ मदत करावी.  त्यामुळे आपण अनेकांना जीवदान देऊ शकतो.  108 या टोल फ्री क्रमांकर संपर्क साधून रुग्णवाहिका पाचारण करून सहकार्य करावे, असेही आवाहन यावेळी वैशाली आठवले यांनी केले.

याप्रसंगी पोलिस नायक प्रकाश सोनवणे, मंगेश वराडे, दीपक पवित्रकार, पत्रकार दिनकर सुंदरकर व मोठ्या संख्येने वाहन चालक उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.