भडगाव | प्रतिनिधी
शहरातील अपंग बांधवांना नगरपरिषद तर्फ सन २०१७/१८ ह्या वर्षाचे ५% निधी वाटप न झाल्यामुळे अपंग बहुद्देशीय सेवाभावी संस्था यांच्या तर्फे आमरण उपोषणाचा इशारा देण्यात आला असून या बाबत मुख्याधिकारी यांना निवेदन देण्यात आले आहे.
निवेदनात म्हटले आहे की, भडगाव नगरपरिषद अंतर्गत येणाऱ्या अपंग बांधवांचा ५ टक्के निधी त्यांच्या विविध उपाययोजना कमी खर्च करण्याबाबत अर्ज दि.१९/१२/१८ रोजी दिला होता. परंतु अद्याप पर्यंत कुठलीही कार्यवाही नगरपालिका प्रशासनामार्फत अपंगांच्या निधी बाबत झालेली दिसत नाही. यामुळे आम्ही अपंग बांधवांनी आमरण उपोषणाचा मार्ग अवलंबला आहे. तसेच भडगाव शहरातील ज्या अपंग बांधवांनी नाव नोंदणी केली आहे त्या सर्वांना ५ टक्के निधीचां लाभ मिळण्यात यावा. सात दिवसाच्या आत निर्णय न झाल्यास आम्ही दि.२३/५/१९ रोजी सकाळी अकरा वाजता नगरपरिषद भडगाव येथे आमरण उपोषणाला बसणार आहे. अश्या आशयाचे निवेदन देण्यात आले असून या निवेदनावर अपंग बहुदेशिय संस्था अध्यक्ष भरत किसन धोबी, उपाध्यक्ष संजय जुलाल कोळी यांच्या स्वाक्षरी आहेत.
Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.