बुलडाणा/प्रतिनिधी
जिल्हातील अपंगांना तात्काळ घरपोच कोविड लस देऊन त्यांच्या हितासाठी अपंग बोर्ड त्वरित सुरु करावी अशी मागणी राजे छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्य विचार मंचाने जिल्हाधिकारी यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे!
जिल्ह्यातील अनेक अपंग व्यक्तींना अपंग प्रमाणपञाची गरज असते. अपंग प्रमाणपञमुळे त्यांचे कामे अडकलेली आहेत. त्यातच कोविडचे रुग्ण संख्या वाढत आहेत. परंतु बुलडाणा येथे फक्त बुधवारलाच अपंगांची तपासणी केल्या जाते व त्यांना बुधवारच्या दिवशीच यावे लागते. अपंगांचा बुधवारचा दिवस सर्व नियमांचे पालन करुन सुरु ठेवण्यात यावा. व त्यांची नोंदणी जलदगतीने करण्यात यावी. तसेच बुलडाणा जिल्ह्यातील सर्व अपंगांचे प्रमाणपञ विनाविलंब द्यावे व सर्व अपंगांना त्यांच्या घरी जाऊन मोफत कोविड लस द्यावी.अशीही मागणी निवेदनकर्त्यांनी केली आहे,सदर निवेदनावर अंबादास घेवंदे, शरद खरात, माणिकराव नरोटे, समाधान चिंचोले, संतोष शिंगणे, शारदाताई पवार, हरिओम घोरपडे, देविदास परहाड आदींच्या सह्या आहेत.