अन स्वतः नगरसेवकाने साफ केले ड्रेनेज

0

नवी दिल्ली – कर्नाटकमधील भारतीय जनता पक्षाच्या एका नगरसेवकाने सर्वांसमोर एक आदर्श उदाहरण ठेवले आहे.  शहरात जोरदार पाऊस झाल्याने रस्त्यावरील साचलेले पाणी वाहून जाण्यासाठी नगरसेवक स्वतः गटारात उतरले. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून सर्वच स्तरातून त्यांचे कौतुक होत आहे.

मंगळूर येथील मनोहर शेट्टी असे त्या भाजप नगरसेवकाचे नाव आहे. माहितीनुसार, गटारीत कचरा साठल्याने पावसाचे पाणी रस्त्यावरून वाहत होते. यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत होता. तसेच पादचारी नागरिकांनीही त्रासाला सामोरे जावे लागत होते. हे कळताच मनोहर शेट्टींनी महापालिका  कामगारांना सांगितले. मात्र, पावसाळ्यात गटारीच्या आत जाणे धोकादायक आहे, असे सांगत कामगारांनी कामास नकार दिला. कामगारांनी एका मशीनच्या साहाय्याने पाणी काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो प्रयत्न अयशस्वी झाला. अखेर मनोहर शेट्टी स्वतःच गटारीत उतरले आणि पाण्याचा निचरा केला.

मनोहर शेट्टी म्हणाले कि, मी जेट ऑपरेटरला गटारीत अडकलेला कचरा साफ करण्यास सांगितले. मात्र, त्यांनी नकार दिला. कोणीही तयार होत नव्हते. म्हणूनच मी गटार साफ करण्याचा विचार केला. मला गटारात प्रवेश करताना पाहिल्याने माझ्या पक्षाचे अन्य चार कार्यकर्तेही आतमध्ये आले. मग आम्ही फ्लॅशलाइटच्या मदतीने गटार स्वच्छ केले. यामध्ये आम्हाला अर्धा दिवस लागला. पण आत अडकलेला कचरा आम्ही स्वच्छ केला. ज्यामुळे पाईपलाईन साफ ​​झाली आणि उर्वरित भागातून पाणी येऊ लागले. रस्त्यावर साचलेले पाणीही वाहून गेले.

शेट्टी पुढे म्हणाले, आपण केळ गरीबांवर गटार स्वच्छ करण्यास दबाव टाकू शकत नाही. त्यांना काही झाल्यास त्याची जबाबदारी कोण घेईल? या कारणास्तव मी स्वतःच गटार साफ केले. हे सर्व मी कोणत्याही लोकप्रियतेसाठी केलेले नाही. हा फक्त माझ्या कर्तव्याचा एक भाग आहे. आम्ही निवडलेले जनप्रतिनिधी आहोत. जर आपण कोणतीही कामे त्वरीत करू शकत असाल तर ते केलेच पाहिजे. पावसाळ्यात मंगळूरमध्ये मुसळधार पाऊस पडत असतो. म्हणून आम्ही फार काळ थांबू शकलो नाही, असे त्यांनी सांगितले.

दरम्यान, मनोहर शेट्टी कादरी दक्षिणी सीटचे नगरसेवक असून ते पहिल्यांदाच निवडून आले आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.