…अन रस्त्यावर पैशांचा पाऊस …गोळा करण्यासाठी लोकांनी गर्दी !

0

व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

जॉर्जिया : अमेरिकेच्या जॉर्जिया प्रांताची राजधानी अटलांटामध्ये एका हायवेवर पैशांचा (डॉलरचा) पाऊसच पाहायला मिळाला. हायवेवरून एका डॉलर वाहून नेणाऱ्या गाडीचा दरवाजा उघडा राहिल्याने सगळे डॉलर हवेत उडाले. हवेत उडालेले हे डॉलर सर्व रस्त्यावर पसरले आणि ते गोळा करण्यासाठी लोकांनी गर्दी केली.

या घटनेचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. एका  प्रत्यक्षदर्शीने सांगितले की, एका गाडीतून अचानक नोटा हवेत उडून जमिनीवर पडू लागल्या. बराच वेळ त्या गाडीतील लोकांना या गोष्टीची कल्पनाही नव्हती. जोपर्यंत त्यांना ही गोष्ट कळली तोवर खूप सारे डॉलर हवेत उडाले होते. यावेळी रस्त्याने येजा करणाऱ्या लोकांनी आपापल्या गाड्या रस्त्याच्या कडेला लावत डॉलर घेण्यासाठी धाव घेतली. वाहनचालक आणि संबंधित लोकांच्या दुर्लक्षामुळे  175,000 म्हणजे जवळपास 1 कोटी  20 लाख हवेत उडाले. यापैकी जवळपास एक लाख डॉलर हस्तगत करण्यात पोलिसांना यश मिळाले आहे. 75 हजार डॉलर घेऊन लोकांनी पोबारा केला आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.