…अन् रवींद्र जडेजानं भाजपाला पाठिंबा जाहीर केला!

0

नवी दिल्ली :– वडील आणि बहिणीने काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर क्रिकेटपटू रवींद्र जडेजाने अखेर कोणत्या पक्षाला पाठिंबा जाहीर करणार, याचे उत्तर दिले आहे. जडेजाची पत्नी रिवाबाने गेल्या महिन्यात भाजपा प्रवेश केला आणि रिवाबा जामनगर मतदारसंघातून लोकसभा निवडणुक लढवत आहे. आता रवींद्र जडेजानेही ट्विटरवरुन भाजपाला पाठिंबा जाहीर केला आहे.

रवींद्र जडेजाची मोठी बहीण नयनाबा जडेजा आणि वडील अनिरुद्ध सिंह यांनी रविवारी जामनगरमधील कार्यक्रमात काँग्रेसमध्ये प्रवेश केला. नयनाबा या सरकारी रुग्णालयात परिचारिका होत्या. महिला सशक्तीकरणासाठी काम करायचे असल्याने काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याचे त्यांनी म्हटले होते. मार्च महिन्यात रवींद्र जडेजाची पत्नी रिवावाने भाजपात प्रवेश केला होता. या पार्श्वभूमीवर रवींद्र जडेजा नेमका कोणाला पाठिंबा देणार, याची उत्सुकता निर्माण झाली होती. अखेर रवींद्र जडेजाने ट्विटरवरुन भाजपाला पाठिंबा जाहीर केला आहे.

दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही जडेजाचे स्वागत केले. त्यांनीही ट्विट करत लिहीले की,”रवींद्र जडेजाचे आभार… आगामी वर्ल्ड कप स्पर्धेसाठीच्या भारतीय संघात निवड झाल्याबद्दल तुझे अभिनंदन.”

Leave A Reply

Your email address will not be published.