..अन् माणुसकी धावून आली! नगरसेवक, सहकाऱ्यांकडून वृद्धेचा अंत्यविधी

0

यावल, (प्रतिनीधी) : रक्ताचे नातेजेथे संपते, तेथून माणुसकीचे नाते सुरू होते. कोरोनाच्या महामारीत तर टप्प्या टप्प्यावर संकटे उभी आहे. या कठीण काळात धावून येणारीमाणुसकीही आपण बघतो. असाच काहीसा प्रसंग येथे घडलाय.

येथील शिवाजीनगर भागातील गंगुबाई शेनफडू महाडिक (वय ७५) यांचे अल्प आजाराने गुरुवारी (ता. १५) निधन झाले. दहा वर्षांपूर्वी त्यांच्या पतीचे निधन झाले आहे. त्यांना मुलंबाळ नव्हते. मात्र, भाऊबंदकीत असलेले सदस्य पुणे, मुंबईसारख्या ठिकाणाहून कोरोना विषाणूच्या काळातअंत्यसंस्कारासाठी येणे शक्यनसल्याचा निरोप मिळताच वॉर्डाचे: नगरसेवक मुकेश येवले व त्यांच्या सहकाऱ्यांनी विनाविलंब  मृत महिलेचा गंगुबाई महाडिक अंत्यविधी केला. अग्निडाग प्रकाश सूर्यवंशी यांनी दिला

तर चार खांदेकरी म्हणून योगेश वाणी, गणेश कोल्हे, मोहन भगत, पंकज रोहम हे तयार झाले. त्यांनी खांदा दिला, अशी माहिती बापू जासूद यांनी दिली. याप्रसंगी डॉ. हेमंत येवले, श्रीरंग वाघ, शहाजी येवले, नितीन चव्हाण, शशी यादव, गोपाल मेंढरे, राजू भोईटे, कैलास आलोणे, विलास येवले, चंद्रकांत येवले, शशी रोहम, अशोक येवले, गोपाल काकडे, सागर सूर्यवंशी, विलास कदम, संजय चव्हाण उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.