भडगाव (प्रतिनिधी) : व्यापाऱ्यांनी ग्राहकांना सोशल डीस्टंन्सिग पाळण्याबाबत सुचना द्याव्यात अन्यथा गर्दी झाल्यास दुकानदारांवर कारवाई करण्यात येईल, अशा सुचना मुख्याधिकारी विकास नवाळे यांनी आज पालिकेत आयोजीत व्यापाऱ्यांच्या बैठकीत दिल्या. तर मास्क न वापरणार्या नागरीकांना पाचशे रूपये दंड करण्यात येईल असे त्यांनी सांगितले.
व्यापार्यानी ग्राहकांची गर्दि होणार नाही याबाबत दक्षता घेणे गरजेचे आहे. त्यांनी दुकानाबाहेर ग्राहकांना शोसल डिन्स्टसिंग पाळण्याबाबत कडक सुचना द्याव्यात. जे दुकानदार सोशल डीस्टंन्सिगची सुचनाची अंमलबजावणी करणार नाही त्यांच्यावर यापुढे कारवाई करण्यात येईल असे मुख्याधिकारी विकास नवाळे यांनी व्यापार्याच्या बैठकीत सांगितले. शहरात अनलाॅक सुरू झाल्यानंतर सुचना देऊनही त्याप्रमाणात सोशल डिन्स्टसिंग पालन होत नसल्याने पालिका प्रशासनाने आता कारवाईचा बळगा उचलला आहे.
मास्क न वापरा अन्यथा दंड भरा
शहरात फीरणार्या प्रत्येक नागरीकाने मास्क वापरणे आवश्यक आहे. यापुढे जे नागरीके मास्क वापणार नाही त्यांना 500 रूपये दंड करण्यात येणार आहे. काल शहरात तब्बल 19 नागरीकांवर मास्क वापरला नाही म्हणुन प्रत्येकी 500 रूपये दंडाची कारवाई करण्यात आली. त्यामुळे नागरीकांचे धाबे चांगलेच दणाणले आहे. ही कारवाईची मोहीम दररोज राबविण्यात येणार असल्याचे मुख्याधिकारी विकास नवाळे यांनी सांगितले. त्यामुळे शहरवासीयांनी बाहेर पडतांना मास्क वापरणे आवश्यक आहे. अन्यथा पाचशे रूपये दंड होऊ शकतो.
शुक्रवारचा आठवडे बाजार भरणार नाही
आठवडे बाजाराच्या संदर्भात शासनाचे निर्देश येत नाही तोपर्यंत शहरात आठवडे बाजार भरण्यात येणार नसल्याचे मुख्याधिकारी विकास नवाळे यांनी सांगितले. तर ज्या भाजीपाला व फळविक्रेत्याची गाळे आहेत. त्यांना फक्त दुकानात विक्री करता येणार आहे. त्यांनी बाहेर दुकान थाटु नये. तर जे फेरीवाले आहेत. त्यांना शहरातील महादेव गल्लीतील स्मशानभूमी रस्ता व काॅलनी भागात बाळद रस्त्यावर पालिका प्रशासनाकडुन जागा उपलध्द करून दिली जाणार आहे. ते तेथे शोसल डिन्स्टसिंगचे पालन करून आपला व्यवसाय करू शकतील अशा सुचना पालिका प्रशासनाकडुन देण्यात आल्या. याशिवाय चहा ची दुकान पुर्णत: बंद करण्यात येणार आहे. पालिकेच्या सभागृहात झालेल्या बैठकीला मुख्याधिकारी विकास नवाळे, पोलिस निरीक्षक धनंजय येरूळे व व्यापारी उपस्थित होते. यावेळी पोलिस निरीक्षक धनंजय यांनी ही व्यापार्याना सुचना केल्या. दरम्यान आता शहरात सकाळी 9 वाजेपासून ते दुपारी पाच वाजेपर्यंतच दुकान उघडे ठेवता येणार आहे. त्यानंतर दुकान बंद राहतील. तशा व्यापार्याना आज सुचना देण्यात आल्या. शहरात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता प्रशासनाकडुन देण्यात येणार्या सूचनांचे व्यापार्यानी पालन करावे असे अवाहन पोलिस निरीक्षक धनंजय येरूळे यांनी यावेळी केले.
प्रशासनाकडुन देण्यात येणार्या सूचनांचे प्रत्येक नागरीकाने पालन करणे आवश्यक आहे. जे पालन करणार नाही त्यांची गय केली जाणार नाही. तर व्यापार्यानी दिलेल्या सुचनाची अंमलबजावणी करावी अन्यथा कारवाई केली जाईल. कोरोना चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रत्येक नागरीकांचे सुचनाचे पालन करणे सामुहीक जबाबदारी आहे.
-विकास नवाळे मुख्याधिकारी नगरपरिषद भडगाव