अन्नपूर्णा योजना अंतर्गत भोजन योजनेचा आज शुभारंभ

0

चाळीसगाव – येथील चाळीसगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात शेतमाल विक्रीस येणाऱ्या शेतकऱ्यांसाठी कै. रामराव जिभाऊ, अन्नपूर्णा योजनेअंतर्गत अल्पदरात (१०,रुपयात) भोजन व्यवस्थेचा शुभारंभ  दि. ६/२/२०२० रोजी सकाळी दहा वाजता चाळीसगाव येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या बहुउद्देशीय सभागृहात आयोजित करण्यात आलेले आहे.

या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय  श्री खासदार उन्मेश भैय्यासाहेब पाटील तर या योजनेचे उद्घाटन चाळीसगावचे आमदार माननीय श्री मंगेश रमेश चव्हाण  यांच्या शुभ हस्ते करण्यात येणार असून, या कार्यक्रमास तालुक्यातील शेतकरी बांधव, सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन, सदस्य ,यांनी उपस्थित राहून सदर योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन चाळीसगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्री सरदार सिंग लाल सिंग राजपूत  उपसभापती श्री किशोर भिकन पाटील तसेच प्रभारी सचिव श्री अशोक आनंदा पाटील व संचालक मंडळ यांनी  केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.