अनेर धरणातून खा. रक्षाताई खडसे यांच्याहस्ते आवर्तन सुटले

0

१६ गावांच्या पाण्याची समस्या होणार दूर

चोपडा ;- तालुक्यातील १६ गावांमध्ये पाण्याची तीव्र टंचाई असल्याने अनेर धरणातू पाणी सोडण्याची मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत होती . याची दखल खा. रक्षाताई खडसे यांनी घेऊन पाठपुरावा केल्याने आज शनिवार रोजी खा. खडसे यांच्या हस्ते अनेर धरणातून अनेर नदीच्या पात्रात पाणी सोडण्यात आले . यावेळी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते .


तालुक्यातील गणपूर, भवाळे, गलंगी, धानोरा प्र, घोडगाव, वेळोदे, कुसंबे, अनवर्दे बु, तगडी, मोहिदा, अजंतीसीम, वढोदा, विटनेर, वाळकी, शेंदनी व मालखेडा या १६गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई असल्याने अनेर धरणातून अनेर नदीपात्रामध्ये पाणी सोडन्यात आले. पाणी सोडण्यात आल्यामुळे सर्व १६ गावांमध्ये ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. याप्रसंगी पंस सभापती व तालुकाध्यक्ष आत्माराम म्हाळके, जिप सदस्य गजेंद्र सोनावणे, नगरसेवक गजेंद्र जैस्वाल, जिल्हा चिटणीस राकेश पाटील, तालुका सरचिटणीस पंकज पाटील, डॉ राहुल पाटील, मनोज सनेर, शशी पाटील व 16 गावचे सरपंच, ग्रा प सदस्य, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते .

Leave A Reply

Your email address will not be published.