अनुसुचित जमातीच्या सवलतीसाठी धनगर समाजाचे प्रांताधिकारी कार्यालयावर ढोल जागर आंदोलन

0
भुसावळ, दि.27-
शासनाने धनगर समाजाला सवलत देण्यात टाळाटाळ केल्याने तसेच धनगर समाजाला अनुसुचित जमातीच्या सवलती मिळण्यासाठी येथील प्रांताधिकारी कार्यालयावर आज 27 रोजी महाराष्ट्र धनगर समाज आरक्षण संघर्ष समिती व मल्हार सेनेच्या वतीने ढोल जागर आंदोलन करण्यात आले. तसेच यावेळी पदाधिकार्‍यांनी व कार्यकर्त्यांनी मागण्यांचे निवेदन प्रांताधिकारी डॉ. श्रीकुमार चिंचकर यांना देण्यात आले. यावेळी समाजाच्यावतीने प्रांताधिकारी कार्यालयासमोर धनगर समाजाच्या परंपरेनुसार भंडारा उधळून खंडोबारायाचे गायन करण्यात आले.
महाराष्ट्रातील धनगर समाजाचा अनुसूचित जमातीच्या प्रवर्गात समावेश असतांना राज्यातील धनगर समाजाला उदासिन राज्यकर्त्यांनी अनुसूचित जमातीच्या सवलतींपासून गेल्या 65 वर्षापासून वंचित ठेवले आहे. महाराष्ट्राचे तत्कालीन भाजपा प्रदेशाध्यक्ष तथा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आम्ही सत्तेत आल्यास धनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती त्वरीत लागू करू अशी घोषणा केली होती. त्यांना सत्तेत येवून चार वर्षे झाली मात्र धनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती लागू केल्या नाही. राज्यातील धनगर समाजाला दिलेल्या शब्दाप्रमाणे अनुसूचित जमातीच्या सवलती तात्काळ लागू करण्याची अंमलबजावणी करावी, असे प्रांताधिकारी डॉ. श्रीकुमार चिंचकर यांना  दिलेल्या निवेदनात नमुद करण्यात आले आहे. मागण्या मान्य न झाल्यास तसेच झोपेचे सोंग घेणार्‍या सरकारला जागे करण्यासाठी व आरक्षणाची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेण्यास भाग पाडण्यासाठी महाराष्ट्र धनगर समाज आरक्षण संघर्ष समितीच्यावतीने राज्यव्यापी आंदोलन तीव्र करण्याचा निर्णय घेण्यात आला असून 27 रोजी राज्यातील सर्व जिल्हाधिकारी व तहसील कार्यालयासमोर धनगरी सांस्कृतिक पध्दतीने धनगर आरक्षण ढोल – जागर आंदोलन व धनगर समाज आरक्षण ढोल – जागर आंदोलन करण्यात आले.
खंडोबाची गाणी व भंडार्‍याची उधळण
प्रांत कार्यालयासमोर महाराष्ट्र धनगर समाज आरक्षण संघर्ष समितीच्यावतीने आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन करण्यात आले. यावेळी सांस्कृतिक पध्दतीने धनगरी परंपरेनुसार खंडोबारायाची वही गायन करुन गाणी म्हणण्यात आली. व हळदीचा भंडारा उधळविण्यात आला. यावेळी सुकलाल धनगर,  दिपक काटकर, मनोज मोरे, मधुकर वैदकर, शामराव धनगर, भारत ठाकरे, प्रमोद धनगर, रमेश धनगर,  बंडू धनगर, संजय तायडे,  एकनाथ जंगले,  स्वप्नील सावळे, गजानन धनगर, सुकदेव धनगर, विलास बाळूराव धनगर, विशाल भागवत, रेवा धनगर, विशाल ठोके, अ‍ॅड. सत्यनारायण पाल, सुनिल धनगर, नामदेव गायकवाड, अनिल मंडलिक, डॉ. वैैलास ठाकरे, जीवन पाटील,  बबलू धनगर, संतोष धनगर, नारायण धनगर, नारायण झटके, निलेश झटके यांच्यासह धनगर समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होेते.
Leave A Reply

Your email address will not be published.