अनुभूती इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये ‘संविधान दिन’ साजरा

0

जळगाव – येथील अनुभूती इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये ७१ वा संविधान दिन साजरा करण्यात आला. ऑनलाईन पद्धतीने शिक्षकांनी संविधान दिनाचे महत्त्व विद्यार्थ्यांना समजून सांगितले. यातून विद्यार्थ्यांमध्ये संविधानाबद्दल आदर व जागरूकता निर्माण झाली.

विद्यार्थ्यांना सकाळी 11 वाजेला संविधान दिवस ऑनलाईन पद्धतीने साजरा करण्याची पुर्वकल्पना शिक्षक प्रविण चिमणकर यांनी दिली. नियमित ऑनलाईन वर्ग संपल्यानंतर सर्व विद्यार्थ्यांना गुगल फार्म पाठवून त्याद्वारे लिंक पाठवण्यात आली. सुरूवातीला प्रविण चिमणकर यांनी प्रास्ताविक मांडून संविधान दिवसाचे महत्त्व समजावले. शिक्षिका वंदना मार्कंड व शिक्षिका हर्षा वाणी यांनीही संविधान दिवसाचे महत्त्व विद्यार्थ्यांना पटवून दिले व माहिती दिली. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये भारतीय संविधानाबद्दल आदर आणि जागरूकता निर्माण होऊन नागरिकांच्या कर्तव्याचीसुद्धा त्यांना जाण झाली. यावेळी विद्यार्थ्यांनी संविधानातील मुल्ये, मुलभूत तत्त्वे ऑनलाईन समजून घेतले. संविधान दिवसाच्या ऑनलाईन कार्यक्रमाला सर्व विद्यार्थी व शिक्षक-शिक्षिका मिळून एकूण ८६ जणांनी उपस्थिती दर्शविली. संपुर्ण कार्यक्रम कोविड-१९ च्या शासकीय नियमानुसार घेण्यात आला. कार्यक्रमासाठी प्राचार्य रश्मी लाहोटी व रूपाली वाघ, मनोज दहाडकर यांचे मार्गदर्शन लाभले. यशस्वतेसाठी अनुभूती इंग्लिश मिडियम स्कूलमधील सर्व शिक्षक शिक्षकेतर सहकाऱ्यांनी परिश्रम घेतले.

Leave A Reply

Your email address will not be published.