अनुदान लाटण्यासाठी अनेक गोशाळांचा गोरख धंदा

0

गोशाळेत गाईंची अत्यंत दयनीय अवस्था

यावल :– तालुक्यासह जिल्ह्यात अनेक गोशाळा आहे. यापैकी काही खाजगी आणि इतर काही नोंदणीकृत गोशाळा खरोखर कौतुकास्पद कार्य करणाऱ्या आहेत, तर अनेक गोशाळा फक्त शासनाकडून लाखो रुपयांचे अनुदान लाटण्यासाठी कागदोपत्री कार्यरत आहे. यांच्या काही गोशाळा मधील गायी प्रत्यक्ष बघितल्या असता गाईची अत्यंत दुरावस्था झालेली प्रत्यक्ष दिसून येत आहे.

अनेक गोशाळा वाल्यांनी प्रख्यात संत महंतासह जय श्री कृष्ण, जय गोमाता, इत्यादी अधिक लक्षवेधी नावे देऊन गो शाळांची नोंदणी केलेली आहे. यात अनेक गोशाळाचे कार्य खरोखर कौतुकास्पद आहे गो संवर्धन तथा गाईचे अस्तित्व राखण्यासाठी त्यांचे कार्य महान आहे परंतु यावल तालुक्यासह जिल्ह्यात काही गोशाळा अशा आहेत की त्यांच्या गोशाळेत गाई साठी आवश्यक त्या सुविधा नाहीत त्यांच्या गोशाळेतील गाई प्रत्यक्ष बघितले असता फारच दयनीय अवस्था झालेली आहे, या काही गोशाळेत गाईंना चारा पाणी मिळतो किंवा नाही पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांकडून आरोग्याची तपासणी केली जाते किंवा नाही ? गो शाळांवर कोणाचे नियंत्रण आहे किंवा नाही ? इत्यादी अनेक प्रश्न उपस्थित केले जात असून काही गोशाळा संबंधित हे फक्त शासनाकडून लाखो रुपयांचे अनुदान प्राप्त करण्यासाठी कागद पत्र रंगवीत असल्याचे ग्रामस्थांच्या अनेक तक्रारी आहेत, गाईची तस्करी करणारे, गाईची कत्तल करणारे यांच्याशी सुद्धा या काही गोशाळा वाल्यांचे संबंध आहेत का ? याची वरिष्ठ स्तरावरून व समाजसेवी संस्था , संघटना, गोरक्षा करणार्‍या तरुणांनी चौकशी करावी अशी मागणी होत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.