Friday, August 12, 2022

अनिल देशमुखांना 6 नोव्हेंबरपर्यंत कोठडी

- Advertisement -

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क 

- Advertisement -

राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना आज मुंबई सत्र न्यायालयाच्या सुट्टीकालीन विशेष कोर्टाने जामीन नाकारत ६ नोव्हेंबरपर्यंत कोठडी सुनावली आहे. हा अनिल देशमुखांसह महाविकास आघाडीला मोठा धक्का असल्याचे मानला जात आहे.

- Advertisement -

- Advertisement -

ईडीने देशमुख यांची दीर्घ चौकशी केल्यानंतर मध्यरात्रीनंतर त्यांना अटक केली. त्यानंतर आज सकाळी त्यांना कोर्टात हजर करण्यात आले. देशमुख यांना जामीन मिळावा यासाठी त्यांच्या वकिलांना जोरदार बाजू मांडली असतानाही अखेर कोर्टाने त्यांना जामीन देण्यास नकार दिला. यामुळे अनिल देशमुख याची दिवाळी आता कोठडीतच जाणार आहे.

सुप्रीम कोर्टातही अनिल देशमुख हे केवळ संशयित असल्याचे पूर्वीपासून म्हटले होते. २९ ऑक्टोबरच्या हायकोर्टातील सुनावणीतही तसेच म्हटले होते. त्यानुसार ते ईडीसमोर चौकशीसाठी हजर झाले. मग तीन दिवसांत ईडीला असे काय पुरावे मिळाले की त्यांना अटक करणे आवश्यक वाटले. देशमुख यांची प्रकृती ठीक नाही, त्यांना अनेक आजार आहेत. त्यामुळे ईडी कोठडी देण्यात येऊ नये”, असा युक्तिवाद ज्येष्ठ वकील विक्रम चौधरी यांनी मांडला. मात्र, कोर्टाने हा युक्तीवाद मान्य केला नाही.

 

- Advertisement -
spot_imgspot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

हे वाचायलाच हवे

संबंधित बातम्या