मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क
मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात देशमुख यांना उद्या हजर राहण्यासाठी ईडीने आणखी एक समन्स बजावले आहे. ईडीने अटक करू नये यासाठी अनिल देशमुख यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. पण न्यायालयाने देशमुखांना दिलासा देण्यास नकार दिला होता. त्यामुळे देशमुख यांच्या अडचणी वाढल्या आहेत.
सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरुद्ध कथित मनी लाँडरिंग प्रकरणात अटक करण्यापासून अंतरिम संरक्षण देण्यास नकार दिला. यामुळे देशमुख अटकेची शक्यता अधिक झाली आहे. या शक्यतेमुळे चौकशीपासून दूर राहणाऱ्या अनिल देशमुखांना आता आता चौकशीला हजर राहण्याशिवाय पर्याय उरलेला नाही.
ईडीने अनिल देशमुखांविरोधातील आरोपांच्या चौकशीची गती वाढवली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार ईडीला देशमुख यांच्या चौकशीत काही महत्वाचे धागेदोरे हाती आले आहेत. देशमुख यांनी खाजगी बँकांकडून नियमांचे उल्लंघन करुन कर्ज घेतले आहे. नियमांचे उल्लंघन करुन लोन पास करण्यासाठी देशमुख यांनी मदत केली होती का, याबाबत देखील ईडी तपास करत आहे.