मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडेने मालदीवमध्ये नवीन वर्ष साजरे केले. अनन्यासह कलाकार ईशान खट्टर देखील मालदीवमध्ये सुट्टीचा आनंद घेत आहे. अनन्याने तिचे बिकिनीचे फोटो शेअर केले आहेत आणि चाहत्यांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. फोटोंमध्ये अनन्या समुद्रातून बिकिनी परिधान करून बाहेर येताना दिसत आहेत.
अनन्याने सूर्यफुलाचा पॅटर्न असलेली बिकनी घातली आहे. आणि डिझायनर चष्मा घातला आहे. फोटो शेअर करताना अनन्याने कॅप्शनमध्ये लिहिले आहे, # हॅलो2021 ., अनन्याच्या या फोटोवरती काही तासातच 8 लाखाहून लाईक्स मिळाले आहेत. कमेंट बॉक्समध्ये अनेकांनी अनन्याच्या लूकचे कौतुक केले आहे.
ईशान आणि अनन्या दोघेही आपल्या मालदीव सुट्टीचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत आहेत. खाली पिली या चित्रपटात चाहत्यांना दोघांची जोडी आवडली. अनन्या पांडे सध्या शकुल बत्राच्या एका प्रोजेक्टवर काम करत असल्याची माहिती आहे. तिच्या हाती सध्या दोन प्रकल्प आहेत. पहिला शकुन बत्राचा चित्रपट आहे ज्यांचे नाव अद्याप निश्चित झालेले नाही आणि पुरी जगन्नाथ हा विजय देवरकोंडाचा दुसरा प्रकल्प हाताळत आहेत. हा चित्रपट बर्याच भाषांमध्ये प्रदर्शित होईल.