अमळनेर : तालुक्यातील 67 ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी 1190 कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले 71 कर्मचारी गैरहजर होते.

छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहात निवडणूक कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले. तहसीलदार मिलिंद वाघ यांनी मतदान केंद्राध्यक्ष आणि मतदान अधिकारी यांना निवडणुकीच्या दिवशी करायचे कामकाज याबाबत तर तलाठी वाल्मिक पाटील यांनी ईव्हीएम मशीन जोडणी , सिलिंग आणि एरर आदींबाबत मार्गदर्शन केले.
यावेळी निवासी नायब तहसीलदार योगेश पवार , निवडणूक नायब तहसीलदार ए जे वळवी ,तलाठी मनोहर भावसार , पिंटू चव्हाण , नितीन ढोकने , संदीप पाटील यांच्यासह 257 मतदान केंद्राध्यक्ष , 771 मतदान अधिकारी , 257 शिपाई , 37 निवडणूक अधिकारी ,37 सहायक निवडणूक अधिकारी तसेच गर्दी मुळे कोरोना चा संसर्ग होऊ नये म्हणून तापमान व ऑक्सिजन तपासणी कामी दोन पथके ठेवण्यात आली होती.

